शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन’ कळणार ‘पीएचडी गाईड’ची माहिती

By admin | Updated: January 10, 2015 02:38 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जास्तीत जास्त प्रमाणात ‘डिजीटल’ प्रणालीची अंमलबजावणी कशी करण्यात येऊ शकते ...

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जास्तीत जास्त प्रमाणात ‘डिजीटल’ प्रणालीची अंमलबजावणी कशी करण्यात येऊ शकते यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. ‘पीएचडी’च्या संबंधातील बरीचशी माहिती ‘आॅनलाईन’ कळावी यासंदर्भात निर्णय घेण्यात आले. यानुसार ‘पीएचडी गाईड’ तसेच संबंधित उमेदवारांच्या प्रबंधासंदर्भात ‘आॅनलाईन’ माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साधारणत: ‘पीएचडी’ करणाऱ्या उमेदवारांसमोर सर्वात मोठा संभ्रम असतो तो ‘गाईड’ निवडण्यासंदर्भात. एखाद्या ‘गाईड’च्या मार्गदर्शनात नेमके किती उमेदवार संशोधन करत आहेत याची माहिती नसल्याने अनेकांना ठिकठिकाणी फेरे मारावे लागतात. ही माहिती लवकरच ‘आॅनलाईन’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय संशोधन करणाऱ्या उमेदवाराची माहितीदेखील ‘आॅ़नलाईन’ देण्यात येणार आहे. यात उमेदवाराचा शैक्षणिक आलेख, प्रबंधाची नेमकी स्थिती कळणार आहे.याशिवाय विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांचा पूर्ण ‘रेकॉर्ड’ तसेच प्रवेश तसेच परीक्षाप्रणालीची माहिती ‘आॅनलाईन’ करण्यावर भर देण्यात येणार आहे. परीक्षा संबंधीच्या माहितीचे ‘डिजीटलायझेशन’ करणे ही काळाची गरज आहे. याला पूर्ण होण्यास थोडा कालावधी लागू शकतो, पण सुरुवात झाली हे महत्त्वाचे आहे, असे मत प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)परीक्षा विभागाची सुरक्षा वाढविणारविद्यापीठाच्या परीक्षा विभागात येणाऱ्या जाणाऱ्यांची सातत्याने वर्दळ असते. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची प्रक्रिया सुरू असली तरी सुरक्षारक्षकांची येथे कमतरता आहे. इमारतीच्या प्रवेशद्वारासोबतच अंतर्गत भागातदेखील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यासंदर्भात परीक्षा विभागाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. प्रशासनाकडून यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.सर्व उत्तरपत्रिकांवर ‘ओएमआर’, ‘बारकोड’विद्यापीठाने प्रत्येक उत्तरपत्रिकेवर पहिल्या पानावर ‘ओएमआर’ (आॅप्टिकल मार्क रिकग्निशन) तसेच ‘बारकोड’ रहाणार आहे. यामुळे ‘आॅनला़ईन’ मूल्यांकनाला मदत मिळेल. संबंधित उत्तरपत्रिकांचे अत्याधुनिक ‘स्कॅनर’द्वारे ‘स्कॅन’ करण्यात येईल. परंतु सुरुवातीला प्रत्येक नव्हे तर ठराविक अभ्यासक्रमांचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ होईल, अशी माहिती डॉ.चांदेकर यांनी दिली.