देशी कट्टा आणि शस्त्रे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST2021-03-08T04:07:50+5:302021-03-08T04:07:50+5:30

: एक्स सर्व्हिस मॅन गजाआड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरगुती वादातून एका व्यक्तीच्या गुन्हेगारी वृत्तीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

Indigenous gangs and weapons confiscated | देशी कट्टा आणि शस्त्रे जप्त

देशी कट्टा आणि शस्त्रे जप्त

: एक्स सर्व्हिस मॅन गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरगुती वादातून एका व्यक्तीच्या गुन्हेगारी वृत्तीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी या व्यक्तीच्या घरी छापा घालून त्याच्याकडून देशी कट्टा, जिवंत काडतुसे, बॅरलची बंदूक आणि दोन तलवारी जप्त केल्या. मारुती गजानन कोठेकर (वय ५२) असे त्याचे नाव असून तो एक्स सर्व्हिस मॅन आहे. कोठेकर मूळचा सौंसर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. २६ वर्षे सैन्यदलात सेवा दिल्यानंतर २०१७ मध्ये त्याने निवृत्ती घेतली. नंतर तो नागपुरात आला. सध्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिंझानी कॉलेजमागे तो राहतो. पत्नी आणि दोन मुलांसह राहणाऱ्या कोठेकरच्या घरात नेहमी वाद होतात. ४ मार्चच्या रात्री असाच त्याच्या घरात वाद झाला आणि एकाने पोलिसांना ती माहिती दिली. त्याचे वर्तन संशयास्पद असून त्याच्याकडे शस्त्र असल्याचेही पोलिसांना कळले. त्यामुळे पोलिसांनी ५ मार्चच्या रात्री कोठेकरच्या घरी छापा घातला. घर झडतीत त्याच्याकडे एक देशी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, बॅरलची बंदूक आणि दोन तलवारी आढळल्या. या वेळी कोठेकर घरी नसल्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो मध्य प्रदेशला गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस पथक तिकडे रवाना झाले. शुक्रवारी रात्री त्याला सौंसरजवळच्या मोहखेडा परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपुरात आणल्यानंतर त्याची न्यायालयातून ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली. त्याने शस्त्रे कुठून आणि कशासाठी आणली, त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

----

शस्त्र तस्करीत सहभाग?

आरोपी कोठेकर शस्त्र तस्करीत सहभागी असल्याचा पोलिसांना संशय असून, त्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, साहाय्यक आयुक्त हेमानंद नलावडे, ठाणेदार सत्यवान माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव, सहायक निरीक्षक सागर आव्हाड, राजू बस्तावडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे तसेच कर्मचारी नितीन राऊत, हेमंत उईके, विद्याधर पौनिकर, सुनील बेलसरे आणि कविता ओगारे यांनी ही कामगिरी बजावली.

----

Web Title: Indigenous gangs and weapons confiscated