शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
4
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
5
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
6
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
7
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
8
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
9
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
10
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
11
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
14
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
15
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
16
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
17
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
18
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
19
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
20
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-भाजपच्या मदतीला अपक्ष उमेदवार

By admin | Updated: May 9, 2014 02:13 IST

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपच्या विरोधात रिंगणात उतरलेले काही अपक्ष उमेदवार निवडणुकीनंतर मात्र या दोन्ही पक्षाच्या मदतीला धावले आहेत.

कमलेश वानखेडे ■ नागपूर
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपच्या विरोधात रिंगणात उतरलेले काही अपक्ष उमेदवार निवडणुकीनंतर मात्र या दोन्ही पक्षाच्या मदतीला धावले आहेत. मतमोजणीकरिता नंबर लावण्यासाठी काँग्रेस व भाजप कार्यकर्ते उत्सुक आहेत. मात्र, एका उमेदवारावर किती प्रतिनिधींना प्रवेश द्यायचा, याच्या र्मयादा आहेत. यावर दोन्ही पक्षांनी उपाय शोधला असून अपक्ष उमेदवारांना गळ घालत त्यांचे प्रतिनिधी बनून आपल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश निश्‍चित केला आहे.
१६ मे रोजी कळमना मार्केट यार्ड येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चुरस लागली आहे. विधानसभानिहाय १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. नागपूर लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे येथे एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होईल. नियमानुसार एका टेबलवर एक या प्रमाणे उमेदवाराच्या प्रतिनिधीला प्रवेश दिला जातो. त्यासाठी विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवाराच्या सहीनिशी अर्ज सादर करावा लागतो. सादर केलेल्या अर्जात नाव असलेल्या व्यक्तीची पोलीस पडताळणी होते.नियमाचा विचार केला तर भाजपकडून ८४ व काँग्रेसकडूनही ८४ प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळेल. मतमोजणी केंद्रात आपला नंबर लागला नाही म्हणून नाराज होणार्‍या कार्यकर्त्यांची मोठी संख्या दोन्ही पक्षात आहे. दोन्ही पक्षांनी सुरुवातीला यादी तयार केली होती. मात्र नंतर एका एकाची डिमांड वाढत गेली व यादी ४00 वर पोहचली. शेवटी एवढय़ा कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी काँग्रेस व भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारांना गळ घातली. काहींनी तर अपक्ष उमेदवारांचे घर गाठले. त्यांच्या अर्जावर प्रतिनिधी म्हणून आपली नावे टाकली व प्रवेश निश्‍चित केला आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी ४५0 हून अधिक कार्यकर्ते मतमोजणी केंद्रात दिसतील.