शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव वेतन

By admin | Updated: April 22, 2016 04:56 IST

महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत वगळून) कंत्राटी कामगारांचे किमान वेतन निश्चित केलेले

नागपूर : महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत वगळून) कंत्राटी कामगारांचे किमान वेतन निश्चित केलेले आहे. त्यानुसार वेतन देण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे. या निर्णयाचा लाभ महापालिकेतील नऊ हजार कंत्राटी कामगारांना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने २४ फेब्रुवारी २०१५ रोजी सुधारित वेतनाची अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार कुशल कामगारांना दरमहा १६,६६०, अर्धकुुशल कामगारांना १५,६६० व अकुशल कामगारांना १४,१६० रुपये वेतन देणे आवश्यक होेते. परंतु महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना ७,२०० रुपये वेतन दिले जात होते. गेल्या वर्षभरात वाढीव वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे गेल्या वर्षभराच्या वेतन फरकासह सुधारित वेतन देण्याबाबतचे अपर कामगार आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार १ जानेवारी २०१६ पासून वाढीव फरकासह सुधारित वेतन निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर वा संबंधित कंत्राटदारांकडे असलेल्या नऊ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.कर्मचाऱ्यांना मोठा दिलासामहापालिका आयुक्तांनी निर्णय घेतल्याने हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे स्वागत म्हणून शुक्रवारी दुपारी महापालिका मुख्यालयात आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा शेकडो कर्मचाऱ्यांसह सत्कार करणार आहोत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आयुक्तांना वेळोवेळी पत्र दिले. सभागृहातही हा मुद्दा लावून धरला. सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला. यात अखेर यश आले.- प्रफुल्ल गुडधे, नगरसेवक