शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 11:02 IST

नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ८८.७९ व कामठी खैरी धरण ९०.६३ टक्के भरले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पही ५३.८ टक्के भरला आहे.

ठळक मुद्देअसोलामेंढा १०० टक्के भरले, धाम ९०.९७ टक्के : गोसेखुर्द ५३.८ टक्के भरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही दिवसापासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. पूर्व विदर्भात चांगला पाऊस होत आहे. परिणामी धरणातील पाणीसाठाही वाढला आहे. चंद्रपुरातील असोलामेंढा धरण १०० टक्के भरले आहे. तर वर्धा जिल्ह्यातील धाम ९०.९७ टक्के भरले आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ८८.७९ व कामठी खैरी धरण ९०.६३ टक्के भरले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पही ५३.८ टक्के भरला आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यात ८ आॅगस्टपर्यंत २२४४ दलघमी म्हणजे ६०.२३ टक्के इतके पाणी जमा झाले आहे. जिल्हानिहाय धरणातील पाणीसाठ्याचा विचार केल्यास वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा ७३.२७ टक्के, बोर ७१.७७ टक्के, पोथरा ३९.४३ टक्के भरले. नागपूर जिल्ह्यातील रामटेक खिंडसी २५.२८ टक्के, नांद वणा ३३.५५ आणि वडगाव ६५.८९ टक्के भरले आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह २४.३९ टक्के, सिरपूर २४.९ टक्के, पुजारीटोला १५.२१ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ हे २७.८८ टक्के भरले आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्प ३०.६३ टक्के भरले. भंडारा जिल्ह्यातील बावनथडी ३४.६६ टक्के भरले आहे.

अनेक धरणाचे गेट उघडावे लागलेविभागातील अनेक धरणाचे दरवाजे उघडावे लागले. गोसेखुर्दचे ९ गेट उघडल्या गेले. धापेवाडा बॅरेजचे ५, लोअर वर्धाचे २ गेट उघडल्या गेले.

मध्यम व लघु प्रकल्पांचीही स्थिती उत्तमनागपूर विभागात एकूण ४० मध्यम स्वरूपातील प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठा क्षमता ५३६.४८ दलघमी इतकी आहे. यामध्ये सध्या २७५.२३ दलघमी म्हणजे ५१.३० टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. लघु प्रकल्पही ५० टक्केवर भरली आहेत.

टॅग्स :Waterपाणी