शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयकर अधिकाऱ्यांची बोगस टोळी पकडली

By admin | Updated: August 24, 2016 02:45 IST

आयकर अधिकारी असल्याचे सांगून उद्योजक व भ्रष्ट अधिकाऱ्यांसह अनेकांना लुटणाऱ्या बोगस आयकर अधिकाऱ्यांच्या टोळीचा वाशिम पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

तिघांना अटक : वाशिम पोलिसांची नागपुरात कारवाईनागपूर : आयकर अधिकारी असल्याचे सांगून उद्योजक व भ्रष्ट अधिकाऱ्यांसह अनेकांना लुटणाऱ्या बोगस आयकर अधिकाऱ्यांच्या टोळीचा वाशिम पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टोळीच्या तीन सदस्यांना नागपुरातुन ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ही टोळी नागपुरातील आहे. त्यांचे सहा ते सात सहकारी फरार आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये सुरेश सुरेंद्र कोहळे (२९) पोलीस लाईन टाकळी, प्रकाश अशोक आष्टीकर (४५) रामनगर, अंबाझरी, संदीप रत्नाकर देशमुख (४९) अंबाझरी यांचा समावेश आहे. संदीप शिक्षक असून, तो खासगी शिकवणी घेतो.टोळीत आठ ते दहा सदस्य आहेत. टोळीचे सदस्य चारचाकी वाहनांमध्ये व्यापारी, राजकीय नेता व अवैध धंद्यांमध्ये समाविष्ट असलेल्यांचा शोध घेतात. टार्गेट केलेल्या व्यक्तीकडे अधिकाऱ्यांसारखा पेहराव करून जातात. आयकर अथवा सीबीआयच्या स्पेशल टीमचे सदस्य असल्याचे सांगून घराची झडती घेतात. संधी मिळताच रुपये, दागिने आणि किमती सामान घेऊन पळ काढतात. या टोळीने ९ आॅगस्टला सकाळी ८.३० वाजता वाशिम जिल्ह्यातील सोपान कंवर यांच्या घरी धाड टाकली. स्वत:ला आयकर विभागाच्या स्पेशल टीमचे सदस्य असल्याचे सांगितले. सोपान कंवर हे बिल्डर आहे. त्यांनी या टोळीकडून आयकर विभागाच्या संबंधित कागदपत्राची मागणी करीत, घराची झडती देण्यास नक ार दिला. ओळखपत्र नसल्याने आला संशय नागपूर : कंवर यांनी आरोपींकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यांच्याकडे कुठलेही दस्तावेज नसल्याने, कंवर यांनी आयकर विभागाचे अधिकारी व त्यांच्या सीएला फोन केला. आरोपींच्या हे लक्षात येताच त्यांनी ‘दुसऱ्या जागी छापा मारायचा आहे’ असे सांगून तेथून पसार झाले. ते गेल्यानंतर कंवर यांनी आयकर अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन प्रकरणाची माहिती दिली. आयकर विभागाने कुठल्याही टीमला पाठविले नसल्याचे सांगितले. त्यामुळे कंवर यांनी वाशिम पोलिसात तक्रार केली. पोलिसांच्या तपासात आरोपीजवळ असलेल्या कारचा नंबर मिळाला. कारच्या नंबरच्या आधारावर वाशिम पोलीस २० आॅगस्टला नागपुरात पोहचले. आरोपींना ताब्यात घेऊन सोबत घेऊन गेले. ही कारवाई वाशिमचे पोलीस पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यांची टोळी ‘स्पेशल २६’ सिनेमासारखीआरोपी बऱ्याच काळापासून ‘स्पेशल २६’ सिनेमामध्ये दाखविण्यात आलेल्या टोळीसारखी टोळी संचालित करीत होते. सावज हेरल्यानंतर कारवाई दरम्यान काही धोका आढळल्यास तेथून फरार होत होते. व्यापारी, नेता, अभिनेता, माफिया, भ्रष्ट अधिकाऱ्यासह अनेकांना त्यांनी टार्गेट केल्याची माहिती आहे. बहुतांश पीडित वादापासून वाचण्यासाठी तक्रार दाखल करीत नव्हते. त्यामुळे आरोपी आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले नव्हते. अशाच प्रकारची टोळी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशात बऱ्याच काळापासून सक्रिय आहे. लोकमतने यासंदर्भात बऱ्याच कालावधीपूर्वी खुलासा केला होता.