शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

गोसेखुर्दसह २५ वन प्रभावित सिंचन प्रकल्प जून २०२२ पर्यंत पूर्ण होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 18:57 IST

गोसेखुर्दसह २५ वन प्रभावित सिंचन प्रकल्पांचे काम जून-२०२२ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. महामंडळाच्या नागपूर विभागाचे अधीक्षक अभियंता जे. जी. गवळी यांनी बुधवारी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले.

ठळक मुद्देहायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्दसह २५ वन प्रभावित सिंचन प्रकल्पांचे काम जून-२०२२ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. महामंडळाच्या नागपूर विभागाचे अधीक्षक अभियंता जे. जी. गवळी यांनी बुधवारी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले.डिसेंबर-२०१८ पर्यंत बावनथडी व बोरघाट, मार्च-२०१९ पर्यंत सत्रपूर, खडकपूर्णा व येंगलखेडा, जून-२०१९ पर्यंत झासीनगर, पळसगाव, नागठाणा व पांढवाणी, डिसेंबर-२०१९ पर्यंत तुरागोंडी व चांदस वाठोडा, जून-२०२० पर्यंत शिरुर, नवेगाव, कोसारी, धापेवाडा, कोहळ, लोवर वर्धा व बोर्डी नाला, जून-२०२१ पर्यंत लखमापूर, लोवर चारगड, गोंडेगाव व पांढरी, डिसेंबर-२०२१ पर्यंत गोसेखुर्द तर, जून-२०२२ पर्यंत बेंडारा व हळदीपुराणी प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाईल. गोसेखुर्दसाठी २१ सप्टेंबर २०१६ रोजी १८ हजार ४९४.५७ कोटी रुपये खर्चाला सुधारित मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प वेगात पूर्ण करण्यासाठी १०५८ कोटी रुपयांचे काम नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनला देण्यात आले, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.यासंदर्भात लोकनायक बापुजी अणे स्मारक समितीची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, समितीने या प्रतिज्ञापत्रावर प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला. विदर्भातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात यावेत, अशी समितीची मागणी आहे. समितीतर्फे अ‍ॅड. अविनाश काळे तर, महामंडळातर्फे अ‍ॅड. व्ही. जी. पळशीकर यांनी कामकाज पाहिले.प्रकल्पांना यामुळे होतो विलंबपुढील कारणांमुळे सिंचन प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नसल्याचे महामंडळाने न्यायालयाला सांगितले.

  •  प्रकल्प पीडितांचा विरोध.
  •  निधी वेळेवर उपलब्ध न होणे.
  •  विविध परवानग्या वेळेवर न मिळणे.
  •  प्रकल्पांची सिंचन क्षमता वाढविणे.
  •  बांधकाम साहित्य उपलब्ध नसणे.
  •  तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे.

या प्रकल्पांचे काम पूर्ण झालेमहामंडळानुसार आतापर्यंत ४५ पैकी पुढील १३ वन प्रभावित सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

  •  केकतपूर, जि. अमरावती.
  •  शहापूर, जि. अकोला.
  •  उंदरी, जि. वाशीम
  •  भिवकुंड, जि. नागपूर.
  •  पिंपळगाव, जि. नागपूर.
  •  चोपान, जि. यवतमाळ.
  •  झरांडी, जि. अकोला.
  •  किरमिरी दारुर, जि. चंद्रपूर.
  •  हिराबामबाई, जि. अमरावती.
  •  इटियाडोह झारीफरी, जि. गोंदिया.
  • डोंगरगाव, जि. चंद्रपूर.
  •  झोडगा, जि. वाशीम.
  •  सुकळी, जि. अकोला.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प