लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रशिया-युक्रेन, अफगाणिस्तान-पाकिस्तान आणि इस्रायल-अमेरिका-इराण यांसारख्या जागतिक संघर्षांच्या पार्श्वभूमीवर जगभरात तणावाचे सावट दाटले आहे. अशा अस्थिर वातावरणातून मानसिक शांततेच्या शोधात सातासमुद्रापारचा एक तरुण थेट कामठीत दाखल झाला आहे. अमेरिकेतील 'युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन'चा रॉन वेरेड या २४ वर्षीय विद्यार्थ्याने कामठी येथील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील 'ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर' मध्ये १० दिवसांचे निवासी शिबीर यशस्वीरित्या पूर्ण केले.
जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असताना, रॉनने आधुनिक जीवनातील तणावावर उपाय म्हणून भारतीय प्राचीन ‘विपश्यना’ ध्यानपद्धतीची निवड केली. ६ मार्च ते १७ मार्च २०२६ या कालावधीत त्याने निवासी शिबिरात सहभागी होत आत्मशोधाचा प्रवास अनुभवला.
रॉन हा वैद्यकीय (एमडी) शिक्षण घेत असलेला विद्यार्थी असून, विज्ञानासोबतच मनाचे विज्ञान समजून घेण्याची त्याची ओढ त्याला कामठीत घेऊन आली. विशेष म्हणजे, १० दिवसांच्या या शिबिरादरम्यान त्याने पूर्ण मौन पाळत कठोर शिस्तीचे पालन केले. या अनुभवामुळे त्याच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले जाते. युद्धाच्या गोंधळातही ‘शांततेचा मार्ग’ निवडणाऱ्या या तरुणाची कहाणी आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.
कामठीचे जागतिक आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित
ड्रॅगन पॅलेसटेम्पल येथील विपश्यना केंद्र हे आता केवळ विदर्भापुरते मर्यादित न राहता जागतिक साधकांचे आकर्षण ठरत आहे. अमेरिकेहून आलेल्या या तरुणाच्या साधनेमुळे कामठीच्या आध्यात्मिक ओळखीला जागतिक स्तरावर नवे अधोरेखित स्थान मिळाले आहे.
Web Summary : Amidst global tensions, an American student found solace in India. He completed a 10-day Vipassana course in Kamthi, seeking mental peace and a new perspective on life through ancient meditation techniques, embracing silence and discipline.
Web Summary : वैश्विक तनाव के बीच, एक अमेरिकी छात्र ने भारत में सांत्वना पाई। उन्होंने मानसिक शांति और प्राचीन ध्यान तकनीकों के माध्यम से जीवन पर एक नया दृष्टिकोण पाने के लिए कामठी में 10 दिवसीय विपश्यना पाठ्यक्रम पूरा किया, मौन और अनुशासन को अपनाया।