लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर / रामटेक : रामटेक मतदारसंघात मोडणाऱ्या दोन नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि शिंदेसेना महायुती म्हणूनच लढणार असल्याची माहिती आहे. यात रामटेक नगपरिषद आणि पारशिवनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिंदेसेनेचा तर कन्हान-पिंपरी नगरपरिषद आणि कांद्री कन्हान नगरपंचायतीचा उमेदवार भाजपचा असेल, अशी माहिती आहे. यासंदर्भात प्रदेश पातळीवरचे नेते निर्णय घेतील, अशी माहिती भाजपच्या जिल्हास्तरावरील नेत्याने दिली आहे. याबाबत शिंदेसेनेकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. रामटेकमध्ये भाजपची स्वतःची ताकद आहे. गतवेळी नगराध्यक्षासह भाजपचे १३ नगरसेवक विजयी झाले होते. शिवसेनेचे केवळ दोन नगरसेवक होते. अशात भाजपने रामटेक नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोमवारी केली.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. अशात रामटेक नगरपरिषदेत शिंदेसेनेसोबत युती होणार की नाही? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे या विषयावर तातडीने तोडगा निघणे गरजेचे आहे. या पाश्वभूमीवर माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, माजी उपाध्यक्ष आलोक मानकर, ज्योती कोल्हेपरा यांच्यासह ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांची भेट घेत भूमिका मांडली. पक्षाला शिंदेसेनेसोबत युती करायची असेल तर करा इतर पदांबाबत चर्चा करा. मात्र, नगराध्यक्षपदावरचा दावा सोडू नका, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना महायुतीचा धर्म पाळण्याच्या सूचना केल्या. यासोबतच महायुती शक्य नसलेल्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील. तिथे मतभेद आणि मनभेद होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.
काँग्रेस-उद्धवसेना एकत्र लढणार का?
रामटेकमध्ये काँग्रेसनेही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहे. विधानसभेत महाविकास आघाडीत रामटेकची जागा उद्धवसेनेला सुटली होती. मात्र, काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करीत उद्धवसेनेचे उमेदवार विशाल बरबटे यांना मागे टाकले होते. त्यामुळे या मतदारसंघातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढतात की काँग्रेस स्वबळावर लढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कसा आहे युतीचा फाम्युला?
रामटेक मतदारसंघातील रामटेक नगरपरिषद, पारशिवनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक महायुतीत शिंदेसेना लढवेल तर कन्हान-पिंपरी आणि कन्हान-क्रांदी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजप लढवेल. याशिवाय या चारही ठिकाणी गतवेळी ज्यांचे जितके नगरसेवक विजयी झाले होते तवढ्या जागा दोन्ही पक्ष लढवेल. सोबतच ज्या प्रभागात पराभव झाला होता, त्या जागा दोन्ही पक्ष निम्या लढतील असा फार्म्युला भाजपकडून देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही.
पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही अर्ज नाही
जिल्ह्यातील १५ नगपरिषद आणि १२ नगरपंचायतींसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू झाली.दरम्यान, सर्वच प्रमुख पक्षांचे जागा वाटप अद्याप निश्चिच झाले नसल्याने एकही अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल झालेला नाही.१३ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.
Web Summary : In Nagpur, BJP and Shinde Sena will contest local elections together. Shinde Sena will field candidates for Ramtek and Parshivni, while BJP will contest Kanhan-Pimpri and Kandri-Kanhan. Official confirmation from Shinde Sena is awaited, but BJP aims for a seat-sharing formula based on previous election results.
Web Summary : नागपुर में, भाजपा और शिंदे सेना स्थानीय चुनाव एक साथ लड़ेंगे। शिंदे सेना रामटेक और पारशिवनी से उम्मीदवार उतारेगी, जबकि भाजपा कन्हान-पिंपरी और कांद्री-कन्हान से चुनाव लड़ेगी। शिंदे सेना से आधिकारिक पुष्टि का इंतजार है, लेकिन भाजपा का लक्ष्य पिछले चुनाव परिणामों के आधार पर सीट-बंटवारे का फार्मूला है।