नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
By योगेश पांडे | Updated: May 23, 2025 20:30 IST2025-05-23T20:28:29+5:302025-05-23T20:30:14+5:30
Nagpur Crime News In Marathi: आरोपीचे संशयास्पद वर्तन अकादमीच्या सुरक्षा रक्षक रुस्तमला अंशतः लक्षात आले, ज्याने खोब्रागडेला पकडण्याचा प्रयत्न केला.

नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
योगेश पांडे, नागपूर
Nagpur Crime news: सेमिनरी हिल्सजवळ एका वासनांध व्यक्तीने चक्क घोड्यासोबतच विकृत कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कृत्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूरज उर्फ छोट्या सुंदर खोब्रागडे (३०, मानवता नगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने टीव्ही टॉवरजवळील डिस्ट्रीक्ट इक्वेस्ट्रीयन असोसिएशन-द हॉर्स रायडिंग अकादमीमध्ये हे घृणित कृत्य केले आहे.
चोरी करण्यासाठी आला अन्...
१७ मे रोजी तो अकादमीत चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला. त्यावेळी तेथे १७ घोडे होते. त्याने अकादमीतून दोन हजार रुपयांचे लोखंडी ॲंगल चोरले. त्यावेळी अचानक तो एका घोड्याच्या पिल्लाकडे (शिंगरु) वळला व विकृत अनैसर्गिक कृत्य करायला लागला.
त्याचे संशयास्पद वर्तन अकादमीच्या सुरक्षा रक्षक रुस्तमला अंशतः लक्षात आले, ज्याने खोब्रागडेला पकडण्याचा प्रयत्न केला. तथापि, आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
सीसीटीव्ही बघितल्यानंतर बसला धक्का
रुस्तमने चोरीबद्दल तेथील मालक प्रमोद संपत लाडवे (३१ ) यांना माहिती दिली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना धक्काच बसला. आरोपी तेथे विकृत कृत्य करताना दिसून आला.
त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी खोब्रागडेविरोधात चोरी तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.