शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचा विकास योजनांवर परिणाम

By admin | Updated: May 12, 2014 00:29 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा जिल्हा परिषदेच्या विविध योजनांवर परिणाम झाला आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांसोबतच रस्ते दुरुस्ती, दलित वस्त्यातील विकास कामे, ...

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा जिल्हा परिषदेच्या विविध योजनांवर परिणाम झाला आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांसोबतच रस्ते दुरुस्ती, दलित वस्त्यातील विकास कामे, अंगणवाडी व आरोग्य केंद्रांचे बांधकाम अशा कामांना फटका बसला आहे. महिला व बाल कल्याण विभागामार्फ त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सौर कंदील पुरविणे, महिलांना पिको फॉल मशीन पुरविणे, सोलर कुकरचे वाटप थांबले आहे. कृ षी विभागातर्फे पीक संरक्षणासाठी शेतकर्‍यांना ताडपत्री वाटप, ओलितासाठी पीव्हीसी पाईप, आॅईल इंजिन, पेट्रोल व केरोसीन इंजिन, इलेक्ट्रिक मोटारपंप, ताडपत्री वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात वाटप केले जाणार होते. परंतु आचारसंहितेमुळे लाभार्थ्यांना साहित्य वाटप करता आलेले नाही. बांधकाम विभागाने रस्ते व पूल दुरुस्तीचे नियोजन केले आहे. यासाठी शासनाने ३२ कोटी मंजूर केले आहे. प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठवावयाचा आहे. रस्ते दुरुस्तीची तातडीची गरज असतानाही आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव थांबला आहे. सेसफंडात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु अद्याप कार्यादेशाची प्रक्रि या थांबली आहे. शिक्षण विभागामार्फत उन्हाळ्याच्या दिवसात शाळा खोल्यांची विशेष दुरुस्ती करणे गरजेचे असते. यासाठी जि.प.च्या सेसफं डात ४५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. शेतकर्‍यांना धान्यकोठी पुरविणे, बेरोजगारांना साहित्य वाटप, टिनपत्रे, ताडपत्री, कांडप मशीन, शेतीची अवजारे, पॉवर स्प्रे पंप, मासेमारी जाळे तसेच गृह उद्योगासाठी साहित्य पुरविले जाते. या योजनांना आचारसंहितेचा फटका बसला आहे. शिक्षण, समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटपासाठी तीन कोटींची तरतूद केली आहे. सुरुवातीला पदाधिकारी व अधिकार्‍यांतील वादामुळे सायकल वाटप रखडले. हा वाद शमल्यानंतर विद्यार्थ्यांना सायकली मिळण्याची अपेक्षा असतानाच, आचारसंहिता लागल्याने वाटप पुन्हा लांबणीवर पडले. (प्रतिनिधी)