शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

मी चाललोय, पण मंथली रिपोर्ट पाठवा !

By admin | Updated: May 1, 2015 02:22 IST

अमरावती जिल्ह्यातील ‘किसान यात्रा’ आटोपून नागपुरात परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सायंकाळी तब्बल एक तास काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला.

कमलेश वानखेडे नागपूरअमरावती जिल्ह्यातील ‘किसान यात्रा’ आटोपून नागपुरात परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सायंकाळी तब्बल एक तास काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. पदयात्रेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत विषय पोहचविला. मात्र, मी गेल्यावर त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कुणी जाणार आहे का, असा सवाल राहुल यांनी काँग्रेस नेत्यांना केला. आता स्थानिक नेत्यांवर ही जबाबदारी द्या. मी भेटी दिलेल्या भागात पुढे तुम्ही काय केले याचा दर १५ दिवसांनी किंवा महिनाभराने लेखी रिपोर्ट पाठवा, अशा कडक सूचनाही त्यांनी नेत्यांना दिला. राहुल गांधी पदयात्रा आटोपून नागपूर विमानतळावर सायंकाळी ६.३० वाजता पोहचले. यानंतर व्हीआयपी लाऊंजमध्ये रात्री ७.४५ पर्यंत त्यांनी सर्व नेत्यांची बैठक घेतली. सुरुवातीला सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर आपले रोखठोक मत मांडले. या वेळी अ.भा. काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. अविनाश पांडे, आ. सुनील केदार, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम, माजी मंत्री अनिस अहमद, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, काँग्रेस नेते नाना गावंडे, अनंतराव घारड, डॉ.बबनराव तायवाडे, के.के. पांडे, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री आदी उपस्थित होते.