रेल्वेगाड्यात वाढले अवैध व्हेंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:24+5:302021-01-04T04:07:24+5:30

नागपूर : कोरोनानंतर हळुहळु रेल्वेगाड्यांची संख्या वाढत आहे. वाढत असलेल्या रेल्वेगाड्यांसोबत अवैध व्हेंडरही सक्रिय झाले आहेत. डिसेंबर महिन्यात रेल्वे ...

Illegal vendors increased in trains | रेल्वेगाड्यात वाढले अवैध व्हेंडर

रेल्वेगाड्यात वाढले अवैध व्हेंडर

नागपूर : कोरोनानंतर हळुहळु रेल्वेगाड्यांची संख्या वाढत आहे. वाढत असलेल्या रेल्वेगाड्यांसोबत अवैध व्हेंडरही सक्रिय झाले आहेत. डिसेंबर महिन्यात रेल्वे सुरक्षा दलाने १५० पेक्षा अधिक अवैध व्हेंडरवर कारवाई करून त्यांच्या विरुद्ध रेल्वे अक्ट १४४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वेगाड्यात अधिकृत परवाना असल्याशिवाय खाद्यपदार्थ विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. रेल्वे अक्ट १४४ नुसार अशा अवैध व्हेंडरला ३ हजार रुपये दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत परवाना घेणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेकजण परवाना नसताना खाद्यपदार्थ विकतात. अशा अवैध व्हेंडरविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने मोहीम सुरु केली आहे. डिसेंबर महिन्यात १५० अवैध व्हेंडरवर कारवाई करून त्यांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानकावर अवैध व्हेंडर नसले तरी ग्रामीण भागातून तसेच आऊटरकडील भागातून अवैध व्हेंडर रेल्वेगाड्यात प्रवेश करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने ग्रामीण भागात तसेच आऊटरकडील भागात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्याची गरज निर्माण झाली आहे.

.............

Web Title: Illegal vendors increased in trains