शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वृक्ष कटाई; आरोपी मोकाट!

By admin | Updated: October 11, 2014 02:54 IST

गत आठवडाभरापूर्वी बुटीबोरी वन परिक्षेत्रात विना परवानगी वृक्षतोड करून, लाकडाची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक पकडण्यात आला असताना, ...

नागपूर : गत आठवडाभरापूर्वी बुटीबोरी वन परिक्षेत्रात विना परवानगी वृक्षतोड करून, लाकडाची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक पकडण्यात आला असताना, अजूनपर्यंत संबंधित आरोपींविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नसून, तो मोकाट फिरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वन अधिकारी संबंधित क्षेत्राचा सर्वे केल्यानंतरच सत्यता पुढे येणार असल्याचे सांगून, प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करू लागले आहे. दुसरीकडे गत आठ दिवसांपासून अजूनही येथील सर्वे झालेला नाही. हे विशेष. माहिती सूत्रानुसार आरोपीने यापूर्वीही घटनास्थळावरून चार ट्रक माल नेला आहे. शेवटी दक्षता विभागाचे डीएफओ प्रदीप मसराम यांच्या हाती पाचवा ट्रक लागला. दरम्यान मसराम यांनी प्राथमिक चौकशी केली असता, ट्रक ड्रायव्हरकडे लाकूड वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे तो ट्रक लगेच बुटीबोरी येथील वन कार्यालयात उभा करण्यात आला. मात्र आता त्या घटनेला एक आठवड्याचा कालावधी लोटला असून, अजूनपर्यंत आरोपीविरुद्ध कोणतीही कारवाई कां करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बुटीबोरी येथील वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश ठेंगडी पकडण्यात आलेल्या ट्रकमधील माल खाजगी खसऱ्यातील असल्याचे सांगून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र जाणकारांच्या मते, तो माल खाजगी खसऱ्यातील असला तरी, त्याच्या वाहतुकीसाठी वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. अशाप्रकारे ठेंगडी यांच्या वनपरिक्षेत्रात खुलेआम वृक्षकटाई करून, त्याची सर्रास अवैध वाहतूक केली जात असताना त्यांच्या लक्षात का आले नाही, असा सहज प्रश्न उपस्थित केला जात आहे. माहिती सूत्रानुसार काही वन अधिकारी संबंधित आरोपीशी हातमिळवणी करून संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळेच अजूनपर्यंत कुणाविरुद्धही कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी)