काेराेनाची लक्षणे नसल्यास टेस्टसाठी चार-पाच दिवस वाट बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:09 AM2021-04-16T04:09:18+5:302021-04-16T04:09:18+5:30

मेहा शर्मा नागपूर : काेराेना संक्रमितांच्या संपर्कात आल्यानंतर प्रत्येक जण त्वरित आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी धावतात. मात्र अनेकदा त्यांचा रिपाेर्ट ...

If you have no symptoms, wait four to five days for the test | काेराेनाची लक्षणे नसल्यास टेस्टसाठी चार-पाच दिवस वाट बघा

काेराेनाची लक्षणे नसल्यास टेस्टसाठी चार-पाच दिवस वाट बघा

Next

मेहा शर्मा

नागपूर : काेराेना संक्रमितांच्या संपर्कात आल्यानंतर प्रत्येक जण त्वरित आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी धावतात. मात्र अनेकदा त्यांचा रिपाेर्ट निगेटिव्ह येतो व नंतर मात्र पाॅझिटिव्ह येतो. त्यामुळे एखाद्या संक्रमिताच्या संपर्कात आल्यानंतर लक्षणे नसल्यास त्वरित टेस्ट करण्यापेक्षा किमान चार-पाच दिवसांनंतर ती करावी, असे आवाहन शहरातील तज्ज्ञ डाॅक्टरांनी केले आहे.

लाेकमतशी बाेलताना डाॅ. राजीव खंडेलवाल यांनी सांगितले, अनेकदा रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह येते, पण एचआर-सीटीमध्ये लक्षणे आढळून येतात. ज्यावरून ती व्यक्ती संक्रमित असल्याचे लक्षात येते. पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर लाेक तणावातून त्वरित टेस्ट करायला जातात. यामुळे आरटीपीसीआर रिपाेर्ट मिळायला वेळ लागताे आहे. त्यामुळे लक्षण नसल्यास टेस्ट करण्यासाठी चार-पाच दिवस वाट बघावी, असे आवाहन त्यांनी केले. डाॅ. जय देशमुख म्हणाले, काेराेना संक्रमण वेगाने पसरण्याचे आणखी एक कारण म्हणजे लाेक पहिल्या दिवसापासून स्वत:ला आयसाेलेट करीत नाहीत. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून लाेकांनी स्वत:ला आयसाेलेट करण्याची सूचना त्यांनी दिली. घरी असाल तर दाेन मास्क वापरा व घरच्या सदस्यांनाही तसे करायला सांगा. लाॅकडाऊनऐवजी अशा उपायांमुळे लाेक काेराेनाची चेन ताेडू शकतील. डाॅ. अशाेक अरबट यांनी सांगितले, आरटीपीसीआर ६२ ते ६८ टक्के संवेदनशील आहे. टेस्टचे रिपाेर्ट अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असतात. पहिल्या दिवशी केलेल्या टेस्टचे अनेकदा ठाेस रिपाेर्ट येत नाहीत. लक्षणे दिसून आली तर तीन ते चार दिवसांनी टेस्ट करावी, असा सल्ला त्यांनी दिला.

Web Title: If you have no symptoms, wait four to five days for the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.