युती न झाल्यास विधानसभेच्या १५ जागा लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 07:34 IST2023-02-17T07:34:24+5:302023-02-17T07:34:57+5:30
आ. कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय गमतीचा झाला आहे. २० मंत्री करायचे आहेत, ५० लोक रांगेत आहेत.

युती न झाल्यास विधानसभेच्या १५ जागा लढवणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आ. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने आतापासूनच विधान निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप - शिंदे गटासोबत युती झाली तर योग्यच, अन्यथा आपण विधानसभेच्या १५ जागा लढवणार, असा अप्रत्यक्ष इशारा आ. कडू यांनी गुरुवारी नागपुरात दिला.
आ. कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय गमतीचा झाला आहे. २० मंत्री करायचे आहेत, ५० लोक रांगेत आहेत. आता विस्तार आहे म्हणून अर्धे लोक मुंबईतच असतात. विस्तार केल्यावर भूकंप होईल, अशी स्थिती नाही. विस्तार झाल्यावर कुणी बाहेर जाणार नाही, उलट इकडेच येतील. आपल्याला मंत्रिपदाची चिंता नाही. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार दिव्यांग मंत्रालयाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवार हे मजबूत नेते आहेत. मग, त्यांच्याच परिवारातील व्यक्ती पहाटे शपथ घ्यायला जाते, हे त्यांना माहीत नसेल का? असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला.