काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करू; मल्लिकार्जून खरगे यांचे आश्वासन

By कमलेश वानखेडे | Updated: November 23, 2023 15:48 IST2023-11-23T15:44:30+5:302023-11-23T15:48:34+5:30

नागपुरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

If the Congress government comes, we will do a caste-wise census; Mallikarjun Kharge's assurance | काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करू; मल्लिकार्जून खरगे यांचे आश्वासन

काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करू; मल्लिकार्जून खरगे यांचे आश्वासन

नागपूर : भाजप तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, म्हणून भारत जोडो करीत आहोत. ओबीसींची जातीय जनगणना हीच राहुल गांधी यांची भूमिका आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करू, असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नोटीसबाबत विचारणा केली असता आम्ही सामोरे जाऊ व नोटीस आल्यानंतर ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नेते अविनाश पांडे यांच्या मुलाच्या लग्नासाठी खरगे यांचे गुरुवारी दुपारी नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर विमानतळाबाहेर जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात खरगे यांचे स्वागत केले. विमानतळावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सुनील केदार, माजी खा. विजय दर्डा, विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. राजू पारवे, जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, अनीस अहमद, मुन्ना ओझा, अनंतराव घारड, अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री, विशाल मुत्तेमवार,जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, सभापती अवंतिका लेकुरवाळे, रश्मी बर्वे, प्रफुल्ल गुडधे, मुजीब पठाण, गिरीश पांडव, प्रशांत धवड आदींनी खरगे यांचे स्वागत केले.

Web Title: If the Congress government comes, we will do a caste-wise census; Mallikarjun Kharge's assurance