खासगी कंपन्यांना समांतर वीजपुरवठा परवाना दिल्यास वंचित रस्त्यावर उतरणार !

By आनंद डेकाटे | Updated: June 28, 2025 20:19 IST2025-06-28T20:18:11+5:302025-06-28T20:19:19+5:30

Nagpur : ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

If parallel power supply licenses are given to private companies, the disadvantaged will take to the streets! | खासगी कंपन्यांना समांतर वीजपुरवठा परवाना दिल्यास वंचित रस्त्यावर उतरणार !

If parallel power supply licenses are given to private companies, the disadvantaged will take to the streets!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्यात अदानी व टोरंट कंपनीकडून अनेक शहरांत वीज वितरणाच्या परवान्यासाठी अर्ज केले असून खासगी कंपन्यांना वीजपुरवठा परवाना हा वीज मंडळाच्या खाजगीकरणाची सुरुवात असून सरकारने हे समांतर परवाने देऊ नये. अन्यथा या खाजगीकरण धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.  

राज्यात समांतर वीज परवाना, स्मार्ट मीटर योजना, २०० कोटींच्यावरील महापारेषणचे प्रकल्प टी.बी.सी.बी. पद्धतीने देण्याबाबतच्या धोरणांचे महावितरण व महापारेषण कंपनीचे खासगीकरण केले जात आहे. महावितरणनेही मुंबई शहरातील कुलाबा माहिम, बांद्रा, दहीसर अशा एकूण १३ क्षेत्रात वीज वितरणासाठी परवाना अर्ज दाखल केला आहे. याला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे.

विद्युत क्षेत्रातील विविध कामगार संघटनांचे एकत्रित संघटन असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रसिटी वर्कर्स फेडरेशनकडून महावितरणसह शासनाला राज्यव्यापी संपाचा इशारा देण्यात आला. त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा राहणार असून महावितरणच्या खासगीकरणाचे हे धोरण हाणून पाडण्यासाठी वर्कर्स फेडरेशनने महाराष्ट्रात आंदोलन करीत असल्यास त्याला पाठिंबा आणि कायदेशीर मदत करू. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यातही महावितरणला 'पर्याय' उभा करण्याचे सरकारी धोरण यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. 

 

Web Title: If parallel power supply licenses are given to private companies, the disadvantaged will take to the streets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.