‘माझी मुलगी हवी होती…’ मजुराने पळवली २ वर्षांची मुलगी, आरोपीचे कारण ऐकून पोलीसही चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 20:20 IST2026-02-07T20:19:22+5:302026-02-07T20:20:11+5:30

Nagpur : लग्नाच्या दहावर्षांनंतरही मुलं झाले नसल्याने नागपूरमध्ये एक मजुर बाप बनण्याच्या प्रयत्नात गुन्हेगार बनला. नागपूरमधील कळमेश्वर भागात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक अपहरण घटनेत दिंडोरी (मध्य प्रदेश) येथील मजूराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

‘I wanted my daughter…’ Laborer abducts 2-year-old girl, police surprised after hearing the accused’s reason | ‘माझी मुलगी हवी होती…’ मजुराने पळवली २ वर्षांची मुलगी, आरोपीचे कारण ऐकून पोलीसही चकित

‘I wanted my daughter…’ Laborer abducts 2-year-old girl, police surprised after hearing the accused’s reason

नागपूर : लग्नाच्या दहावर्षांनंतरही मुलं झाले नसल्याने नागपूरमध्ये एक मजुर बाप बनण्याच्या प्रयत्नात गुन्हेगार बनला. नागपूरमधील कळमेश्वर भागात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक अपहरण घटनेत दिंडोरी (मध्य प्रदेश) येथील मजूराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी मजूराने आपल्या सहकारी मजुराच्या दोन वर्षांच्या चिमुकलीचे कामाच्या ठिकाणावरून अपहरण केल्याची घटना समोर आली. 

घटनेनुसार, आरोपी मुकेशकुमार धुर्वे काही महिन्यांपासून कळमेश्वर येथील S.B.L. स्फोटके कंपनी येथे कामाला होता. याच कंपनीत त्याचा सहकारी अमितकुमार पटेलही काम करतो व त्याच्या कुटुंबासह जवळच राहत होता. या कुटुंबाची दोन वर्षांची मुलगी आहे पाहून आपण तिला छोट्या वयात आपल्या आपल्या घरी नेले तर ती आपल्याच वडील समजेल अशा अपेक्षेने त्याने तिचे अपहरण केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी एकटी खेळताना मुकेशकुमार तिला घेऊन गेला, मुलगी लहान असल्याने तिला काहीही कळले नाही. त्यामुळे तिने कोणताही आरडाओरडा केला नाही आणि त्याचाच फायदा आरोपीला झाला. नंतर त्याने तिला कंपनीच्या बसमध्ये झोपवले ज्यामध्ये मजूरांना रोज कामावर घेऊन जाणे होते. ही बस चालवणाऱ्या चालकाच्या लक्षात येताच पोलिसांना त्वरीत सूचना करण्यात आली आणि चिमुकलीला सुरक्षितपणे तिच्या घरच्यांकडे सोपवण्यात आले. 

पोलीस तपासात असे समोर आले की आरोपीचे स्वतःचे मूल नसल्यामुळे त्याने ही करती केली; परंतु पोलिसांनी त्वरित कारवाई करत मुकेशकुमारला अटक केली आहे. पुढील तपास कळमेश्वर पोलिस ठाण्याद्वारे सुरू ठेवण्यात आले आहे. 

Web Title : नि:संतान व्यक्ति ने 2 साल की बच्ची का अपहरण कर उसे अपना बनाने की उम्मीद की

Web Summary : नागपुर में, एक नि:संतान मजदूर ने अपने सहकर्मी की 2 साल की बच्ची का अपहरण कर लिया, उम्मीद थी कि वह उसे पालेगा। बस चालक द्वारा सोते हुए बच्चे को देखने के बाद उसे गिरफ्तार कर लिया गया। बच्ची को सुरक्षित रूप से उसके परिवार को लौटा दिया गया।

Web Title : Childless Man Kidnaps 2-Year-Old Hoping to Raise Her as His Own

Web Summary : In Nagpur, a childless laborer kidnapped a 2-year-old from his coworker, hoping to raise her. He was arrested after the bus driver noticed the sleeping child. The girl was safely returned to her family.