शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अन् मिसेस सीएम झाल्या ‘पास’

By admin | Updated: November 16, 2014 00:48 IST

शिकावू परवाना घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्यानंतर नेमके काय करायचे हे माहीत नसल्यानेच उच्चशिक्षित मंडळीदेखील एजंटची मदत घेतात, तर काही आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन

आरटीओ : वाहन परवाना चाचणीत घेतले २० पैकी १८ गुण सुमेध वाघमारे - नागपूरशिकावू परवाना घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्यानंतर नेमके काय करायचे हे माहीत नसल्यानेच उच्चशिक्षित मंडळीदेखील एजंटची मदत घेतात, तर काही आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन कामे काढून घेतात. परंतु मिसेस सीएम यांनी शनिवारी नवीन पायंडा पाडून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सामान्यांप्रमाणे आरटीओत आल्या. लर्निंग लायसन्ससाठी रांगेत लागल्या. छायाचित्र काढून घेतले. संगणक चाचणी परीक्षा दिली आणि २० पैकी १८ गुण घेऊन पासही झाल्या.नागपूर शहर आरटीओ कार्यालयाचे एजंटला फाटा देणाऱ्या विविध उपाययोजना लागू करण्यामध्ये नेहमीच प्रयत्न राहिले आहे. वाहन चालविण्याचा शिकावू परवाना (लर्निंग लायसन्स) मिळण्यासाठी नुकत्याच सुरू केलेल्या आॅनलाईन अर्ज करण्याच्या योजनेमुळे तर कुणा मध्यस्थाची वा माहीतगाराच्या मदतीची गरजच उरलेली नाही. असे असतानाही, एजंटची मदत घेणाऱ्यांची संख्या कमी झाले नसल्याचे चित्र आहे, तर आपल्या अधिकाराच्या जोरावर दबाव आणून कामे काढून घेणारे काही महाभागही आहेत. याचा रोजच प्रत्यय येत असलेल्या आरटीओ कार्यालयाला आज मात्र वेगळाच अनुभव आला. मिसेस सीएम अमृता फडणवीस यांनी लर्निंग लायसन्ससाठी आॅनलाईन अर्ज भरला. यात शनिवारी दुपारी ११.३० वाजताची वेळ घेतली. वेळेच्या १५ मिनिटांपूर्वी त्या कार्यालयात पोहचल्या. तोपर्यंत कुणालाच याची माहिती नव्हती. सहायक मोटार वाहन निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे त्यांनी जेव्हा लर्निंग लायसन्सचा अर्ज सादर केला, तेव्हा कुठे कार्यालयाला याची माहिती मिळाली. प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके रजेवर असल्याने व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण कार्यालयीन कामासाठी न्यायालयात असल्याने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्ता सांगोळकर हे त्यांच्यासेवेत हजर झाले. परंतु कोणाकडूनच त्यांनी कुठलीही मदत घेतली नाही. सामान्य व्यक्तीप्रमाणे रांगेत लागून संपूर्ण सोपस्कार पार पाडले. विशेष म्हणजे, भल्याभल्यांना घाम आणणाऱ्या संगणक परीक्षेलाही त्या सामोरे गेल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी ३० उमेदवार परीक्षा देत होते. कुणालाच याची माहिती नव्हती. १५ मिनिटांच्या परीक्षेत त्यांनी २० पैकी १८ गुण घेतले. त्या पास झाल्या.