मी दिल्लीत जाण्याची शक्यताच नाही :  देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 10:23 PM2021-07-01T22:23:06+5:302021-07-01T22:23:33+5:30

Devendra Fadnavis केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना स्थान मिळू शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र फडणवीस यांनीच अशा शक्यतांच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

I am not likely to go to Delhi: Devendra Fadnavis | मी दिल्लीत जाण्याची शक्यताच नाही :  देवेंद्र फडणवीस 

मी दिल्लीत जाण्याची शक्यताच नाही :  देवेंद्र फडणवीस 

googlenewsNext
ठळक मुद्देनाना पटोलेंच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना स्थान मिळू शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र फडणवीस यांनीच अशा शक्यतांच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भाजपमध्ये पंतप्रधान मोदी जो आदेश करतात, तो आदेश शिरोधार्ह असतो. माझे शुभचिंतक आहे त्यांना वाटतेय की मला दिल्लीत काही मिळालं तर त्यांना चांगलं होईल. पण त्यांनाही सांगतोय माझी दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. काही लोकांना वाटतं मी दिल्लीला गेलो की बला टळेल; पण बला टळणार नाही असे सांगत त्यांनी महाराष्ट्राबाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट केले. गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

नाना पटोले यांना ऊर्जामंत्री व्हायचं आहे, त्यामुळे त्यांनी सरकारमधील मंत्र्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यांनी त्यांच्याच सरकारमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला आहे. त्यांनी केलेल्या आरोपाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. विधानसभा अध्यक्षपदाबाबत भाजप आता भूमिका मांडणार नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आधी घोषित होऊ द्या, त्यासंदर्भात निर्णय केल्यानंतर भाजप आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिकेच्या मुद्द्यावरदेखील त्यांनी भाष्य केले. पुनर्विचार याचिकेला फार कमी स्कोप असतो. राज्य सरकारचे धोरण वेळकाढूपणाचे. आता तरी जस्टीस भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने पावले उचलावी, असे फडणवीस यांनी प्रतिपादन केले.

Web Title: I am not likely to go to Delhi: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.