शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एचव्हीएसी सल्लागार जी. जे. जिवाणी यांना आयएसएचआरएई जीवनगौरव पुरस्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST

नागपूर : इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अ‍ॅण्ड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्सचा (आयएसएचआरएई) प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार नागपूरचे नामांकित हिटिंग, ...

नागपूर : इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अ‍ॅण्ड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्सचा (आयएसएचआरएई) प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार नागपूरचे नामांकित हिटिंग, व्हेंटिलेशन व एअर कंडिशनिंग (एचव्हीएसी) सल्लागार जी.जे. जिवाणी यांना नॅशनल कमेटी कडून देण्यात आला आहे.

यापूर्वी जिवाणी यांना २०१२-१३ मध्ये याच संस्थेच्या अध्यक्षीय एमिरेटस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून आता जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. जिवाणी यांनी आयआयटी-दिल्ली येथून पदव्युत्तर पदवी संपादन केली असून ते इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स फेलो आहेत. ते चार्टर्ड इंजिनिअर आहेत. जिवाणी यांनी टाटा कन्स्लटिंग इंजिनिअर्स, दलाल कन्स्टलटंटसोबत त्यांच्या इराक आणि सौदी अरेबिया येथील अल यामामा येथील प्रकल्पासाठी प्रमुख म्हणून काम केले आहे.

वर्ष १९८५ मध्ये जिवाणी यांनी नागपुरात हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या क्षेत्रात महानगरांचा दबदबा होता. रहिवासी घरे, सभागृहे, मोठ्या संस्था, हॉटेल्स ते हॉस्पिटल्स, सिनेमा ते बंगलो आदींसाठी त्यांनी जागतिक दर्जाच्या वातानुकुलन व्यवस्था तयार केल्या. सोबतच जिवाणी यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. वयाच्या अवघ्या 30 वर्षी अमेरिकन एअर कंडीशन्ड सोसायटीने त्यांना आपले सभासदत्व बनवले. आयएसएचआरएईच्या नागपूर शाखेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या यांत्रिक अभियांत्रिकी अभ्यास मंडळाचे सदस्य, इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे मानद सचिव ही पदे ते भूषवित आहेत.

जिवाणी यांनी हा पुरस्कार आयएसएचआरएई संस्थेच्या नागपूर शाखेला समर्पित केला असून संस्थेची कोअर कमिटी व माजी अध्यक्षांचे आभार मानले आहेत. स्व. राजीव नासेरी, स्व. राजेंद्र पाटील, स्व. मनीष गडेकर, भूषण जागिरदार आणि मोईन नकवी या पाच सदस्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला आहे.