नागपुरात शेतकऱ्यांचे हास्य योग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:49 IST2018-06-22T00:49:12+5:302018-06-22T00:49:26+5:30

नागपुरात शेतकऱ्यांचे हास्य योग आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोदी सरकारच्या पुढाकाराने २१ जून जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे. सरकारला चार वर्ष झाले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. पिकाला हमी भाव देऊ, उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देऊ, शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करू, सातबारा कोरा करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे आश्वासन दिले होते. परंतु सरकारचे आश्वासन खोटे ठरले. त्यामुळे योग दिवसांच्या निमित्त शासनाचा निषेध म्हणून कळमना धान्य बाजारात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हास्य योग करून निषेध केला. यावेळी संजय सत्येकार शेतकरी नेते, भगवानदास यादव, नारायण ठाकरे, आशिष पाटील, राजू गुडधे, ज्ञानेश्वर चकोले, विष्णू आगासे, सचिन वानखेडे आदी उपस्थित होते.