शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कैसे बताए, क्या गुजर रही है हम पर!

By admin | Updated: July 24, 2015 02:30 IST

प्रसारमाध्यमांचा गराडा, डोळे वर करून पाहण्याचीदेखील सोय नाही. प्रत्येक पाऊल टाकताना स्पष्टपणे झळकणारी निराशा, घाबरलेले-भेदरलेले डोळे अन् पतीला ‘आखरी अलविदा’ केल्यानंतर ...

याकूब मेमनच्या कुटुंबीयांचा उद्विग्न सवाल : आखरी अलविदा अन् दाटून आलेला हुंदकायोगेश पांडे / दयानंद पाईकराव नागपूरनागपूर : प्रसारमाध्यमांचा गराडा, डोळे वर करून पाहण्याचीदेखील सोय नाही. प्रत्येक पाऊल टाकताना स्पष्टपणे झळकणारी निराशा, घाबरलेले-भेदरलेले डोळे अन् पतीला ‘आखरी अलविदा’ केल्यानंतर नागपूर सोडताना दाटून आलेला परंतु महत्प्रयासाने दाबून ठेवलेला हुंदका. डब्यातील सर्व प्रवाशांची प्रश्नार्थक नजर त्यांच्यावरच खिळली असताना अचानक तोंडातून शब्द बाहेर पडतात, आज जैसे कयामत का दिन है. कैसे बताए, क्या गुजर रही है हम पर! मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. अखेरची भेट घेण्यासाठी याकूबची पत्नी राहिन, मुलगी झुबेदा व मेव्हणी नागपूरला आल्या होत्या. दिवसभरात त्यांनी एकदाही प्रतिक्रिया दिली नाही. अखेर दुरंतो एक्स्प्रेसने मुंबईला परतत असताना ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्या समोरील बर्थवर बसूनच सहप्रवाशांशी त्यांच्याबाबत होत असलेल्या संभाषणातून त्यांच्या भावना टिपल्या.मेमन कुटुंबीयांपैकी कुणीही प्रतिक्रिया देण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न न करता ‘लोकमत’ प्रतिनिधीने दुरंतो एक्स्प्रेसमधील बी-४ कोचमधील त्यांच्या ३३, ३४, ३५ या ‘बर्थ’समोर बसूनच त्यांच्या भावना टिपल्या. शेजारीच बसलेल्या मुस्लिम तरुणीने त्यांची अवस्था पाहून राहिन मेमनच्या खांद्यावर हात ठेवला. लागलीच राहिन अन् झुबेदा यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. झुबेदाचा तर डोळ्यांसह पूर्ण चेहरा झाकलेला होता. परंतु इतका वेळ दाबून ठेवलेला तिचा हुंदका बाहेर निघाला. ‘हमने मुल्क मे वापिस आ कर गलती की.‘हमे अल्लाताला पे पुरा भरोसा है’मेमन कुटुंबीय १७, १८ आणि १९ या बर्थवर बसल्यानंतर त्यांना प्रसारमाध्यमांनी घेरले. प्रतिक्रिया देण्याचा आग्रह केला. परंतु मेमन परिवारातील एकही सदस्य बोलण्यास तयार नव्हते. ‘हमे कुछ भी नही बोलना, हम पहले से ही बहोत परेशान है प्लीज हमे और परेशान मत करो’ असे ते वारंवार प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगत होते. इक्बाल नावाच्या नातेवाईकाने ‘हमे अल्लाताला पर पुरा भरोसा है, जो कुछ होगा वो अल्लाह की मर्जी’ अशी प्रतिक्रिया दिली.