शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कशी ही बनवाबनवी?

By admin | Updated: July 14, 2014 02:47 IST

यंदा मान्सून लांबल्याने महागाईत भाज्यांच्या वाढीव दराची

भाज्यांच्या दरात प्रचंड तफावत : नियंत्रण कुणाचे?नागपूर : यंदा मान्सून लांबल्याने महागाईत भाज्यांच्या वाढीव दराची भर पडली आहे. बहुतांश गृहिणी भाज्यांची खरेदी घरासमोर करीत असल्याचा फायदा किरकोळ विक्रेते घेत आहेत. रविवारी ठोक बाजारात ४० रुपये किलोचा दराची कोथिंबीर किरकोळमध्ये १२० रुपये तर ५० रुपये किलोची मिरची १०० आणि ४० च्या टमाटरची १०० रुपयांत विक्री सुरू आहे. दरांच्या बनवाबनवीने गृहिणींचे महिन्याचे बजेट पूर्णत:च बिघडले आहे.बाजारपेठेत ठोक आणि किरकोळमधील भावात प्रचंड तफावत दिसून येत आहे. ठोक बाजारात खरेदी केलेल्या भाज्या खराब होत असल्याने आम्हाला जास्त भावाने विकाव्या लागतात, शिवाय दिवसभरात १०० रुपयांचे २०० रुपये झाले नाही तर भाज्या विकण्यात मजा नाही, असे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. अर्थात किरकोळ विक्रेते १०० ते १५० टक्के नफा कमावून भाज्यांची विक्री करीत आहेत. नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा असावी, अशी गृहिणींची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी तातडीने पाऊल उचलावे, अशी अपेक्षा आहे.मागणी व पुरवठ्याचे प्रमाण योग्य या मोसमात भाज्यांचे भाव कमी असतात, ही बाब खरी आहे. पण यावर्षी मान्सून वेळेवर न आल्याने आवक कमी असली तरीही मागणी आणि पुरवठ्याचे गणित तंतोतंत आहे. किरकोळमध्ये भाव वाढल्याचे काहीही कारण नसल्याचे ठोक विक्रेत्यांचे मत आहे. कळमना बाजारात रविवारी ५० मोठे ट्रक आणि ३ ते ८ टन वजनाच्या १०० गाड्यांची आवक होती. सध्या पाऊस नसल्याने वांगे किडरहित आहे. स्थानिकांसह बाहेरगावातून मोठ्या प्रमाणात आवक आहे. त्यामुळे कळमना ठोक बाजारात वांगे ४ रुपये किलो, पत्ता कोबी १० ते १२ रुपये, फुलकोबी १५ ते २० आणि कोहळे ५ ते ६ रुपये किलो दराने विक्री झाली.फुलकोबी कोल्हापूर येथून येत आहे. नारायणगाव, इंदूर, हवेली येथून टमाटर, पत्ता कोबी बेळगाव व मुलताई, कोथिंबीर लातूर व नांदेड, गवार हैदराबाद, हिरवी मिरची हावेरी (कर्नाटक), सिमला मिरची सांगली व नाशिक, भंडारा व मंडला (मध्य प्रदेश) कारले आणि वांगे नागपूर, दिग्रस, परतवाडा, अंजनगाव, वरुड व आंध्र प्रदेशातून येत आहेत. जुलैच्या अखेरीस भाव कमी होण्याचे संकेत आहेत.(प्रतिनिधी)किरकोळमध्ये कांदे व बटाटे ३० रुपयेकेंद्र सरकारच्या निर्बंधानंतर कांदे आणि बटाट्याचे भाव आटोक्यात आहेत. किरकोळमध्ये ३० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कळमना ठोक बाजारात लाल कांदे १७ ते २१ रुपये किलो असून आवक दररोज १० ते १२ ट्रक आणि पांढरे कांदे १७ ते १९ रुपये किलो तर आवक १० ते १२ ट्रक असल्याची माहिती कळमन्यातील आलू-कांदा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. भाज्याच्या किमती वाढताच बटाट्याला मागणी वाढली. ठोक बाजारात रविवारी दर्जानुसार भाव प्रति किलो १८ ते १९ रुपये होते. किरकोळमध्ये ३० रुपयात विक्री सुरू आहे. कळमन्यात छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथून आवक आहे.