शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या हृदयस्थळाचे जतन कसे होणार?

By admin | Updated: April 18, 2016 05:37 IST

देशाचे भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर आणि नागपूर शहरातील झिरो माईलचा स्तंभ म्हणजे देशाचा

नागपूर : देशाचे भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर आणि नागपूर शहरातील झिरो माईलचा स्तंभ म्हणजे देशाचा भौगोलिक मध्यवर्ती बिंदू होय. येथून देशभरातील शहरांचे अंतर मोजले जाते. त्यामुळे हे ठिकाण नागपूर शहराचेच नव्हे तर देशाचे मानचिन्ह व देशाचे हृदयस्थळ म्हणूनही ओळखले जाते. परंतु देखभाल-दुरुस्तीअभावी झिरो माईलच्या स्तंभाला तडे पडले आहेत. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे देशातील या हृदयस्थळाचे जतन कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती शहर आहे. याची जाण ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात एका इंग्रज अधिकाऱ्याने देशातील या मध्यवर्ती ठिकाणचे भौगोलिक मध्यबिंदू शोधून काढले. देशाचे ते भौगोलिक मध्यबिंदू म्हणजे आपले झिरो माईल होय. या ठिकाणी एक सुंदर असा स्तंभ उभारण्यात आला. हा स्तंभ गोवारी शहीद स्मारक व रिझर्व्ह बँक चौक यादरम्यान उभारण्यात आला आहे. हा स्तंभ कधी उभारण्यात आला, याचा कालावधी दर्शविला नाही. परंतु याच्या बाजूलाच एक दुसरा दगडसुद्धा उभारण्यात आला आहे. त्यावर १९०७ हे वर्ष नोंदविलेले असून, त्यात समुद्रसपाटीपासूनच्या अंतराची नोंद आहे. त्यावरून असे आढळून येते की, झिरो माईलच्या स्तंभाची निर्मिती कदाचित यावर्षी करण्यात आली असावी, असे मानले जाते. या स्तंभाची निर्मिती वालुकाश्मापासून करण्यात आली आहे. त्याचा पायवा गोलाकार असून, त्याचा परीघ ७.९० मीटर इतका आहे. त्याचा पायवा हा षटकोणी आहे. या षटकोणी दगडाचा एक भाग हा एक मीटरचा आहे. या षटकोणी दगडाची उंची ६.५ मीटर एवढी आहे. या षटकोणी दगडावर विविध शहरांचे अंतर दर्शविले आहे. नागपूर शहरातील चारही बाजूंनी असलेल्या शहराचे अंतर मोजण्यात आले. वेकोलिने स्वीकारली होती जबाबदारी यासंदर्भात हेरिटेज कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, झिरो माईलचा विकास करण्याचा मुद्दा समितीच्यापुढे आला होता. तेव्हा वेकोलिने याच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासंदर्भात नासुप्रची मंजुरी घेऊन तसा प्रस्ताव हेरिटेज कमिटीकडे पाठवावयाचा होता, परंतु पुढे काय झाले, कुणालाच माहीत नाही. तेव्हा याचा विकास करणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.