शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

तलावांची कशी करणार दुरुस्ती

By admin | Updated: August 6, 2015 02:52 IST

शासनाकडून प्राप्त होणारा निधी व सेस फंडातील तरतुदीतून जिल्ह्यातील लघु सिंचन तलाव, मामा तलाव, पाझर तलाव, साठवण ..

नागपूर : शासनाकडून प्राप्त होणारा निधी व सेस फंडातील तरतुदीतून जिल्ह्यातील लघु सिंचन तलाव, मामा तलाव, पाझर तलाव, साठवण व कोल्हापुरी बंधाऱ्यांची देखभाल व दुरूस्तीची कामे केली जात होती. परंतु प्रशासनाने हा निधी जलयुक्त शिवारकडे वळविला आहे. त्यामुळे तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे कशी करणार, असा प्रश्न बुधवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला.तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून दरवर्षी ५ ते ६ कोटी व सेस फंडातील २ कोटी असा ७ ते ८ कोटीचा निधी उपलब्ध असायचा. परंतु हा निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी वळविण्यात आला आहे. या योजनेसाठी ३११ गावांची निवड करण्यात आली आहे. याच गावात सिंचन योजना राबविण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. जिल्ह्यात १२३ लघु सिंचन तलाव , ५६ पाझर तलाव, ७ पाझर तलाव, ३९ गाव तलाव, २१४ मालगुजारी तलाव, ८८७ साठवण बंधारे, ७२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. परंतु यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. पाट दुरुस्ती व गेट दुरुस्तीची गरज आहे. दुरुस्ती न झाल्याने तलाव व बंधाऱ्यांची सिंचन क्षमता कमी झाली आहे. परंतु निधी नसल्याने ही कामे रखडली आहेत.कुही तालुक्यातील ८५ मामा तलावांची दुरुस्तीचा मुद्दा सदस्य मनोज तितरमारे यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील परिस्थिती अशीच आहे. पाट व गेट दुरुस्ती नसल्याने तलाव व बंधाऱ्यात पाणीसाठा होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड करताना जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प. व पं.स. सदस्य, पदाधिकारी यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी सदस्यानी केली. हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्याचे निर्देश अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिले.मामा तलाव मासेमारीसाठी लिजवर देण्यात आले आहे. परंतु यात शिंगाड्याचे उत्पादन घेतले जाते. आसलवाडा, चिखली व सेलू या तलावात शिंगाड्याचे उत्पादन घेतले जात आहे. शिंगाड्यावर जंतुनाषकाची फवारणी केली जाते. यामुळे तलावाचे पाणी दूषित झाल्याने गुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच तलावाच्या पाण्यात कपडे धुणाऱ्या महिलांना विविध आजारांना सामोरे जावर लागत आहे. संबंधितावर कारवाई करण्याची मागणी तितरमारे, विनोद पाटील यांनी केली.पारशिवनी तालुक्यातील पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करताना सदस्य कमलाकर मेंघर यांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न जयकमुार वर्मा यांनी उपस्थित केला. पाणलोट क्षेत्रातील विकास कामे राबविताना दिरंगाई केल्यास संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती आशा गायकवाड, उकेश चव्हाण, पुष्पा वाघाडे, दीपक गेडाम यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)