शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रोगाचा प्रादुर्भाव ओळखणार कसा? मेडिकलमध्ये न्युक्लिअर मेडिसीनची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 11:11 IST

Nagpur News एखाद्या अवयवाला बाधा झाली असेल तर त्याचा किती भाग निकामी झाला आहे किंवा चांगला आहे, तसेच उपचारामुळे किती प्रमाणात सुधारणा होते आहे या सर्व बाबींचे ‘न्युक्लिअर मेडिसीन’ या उपचारपद्धतीमधून माहिती होते.

ठळक मुद्दे हृदय, किडनी, कर्करोगाच्या रुग्णांना मिळणार होता लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला, हे ओळखण्यासाठी खूपच महत्त्वाची उपचारपद्धती म्हणजे ‘न्युक्लिअर मेडिसीन’. मेडिकलमधील या विभागाच्या प्रस्तावाला तीन वर्षांपूर्वी जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी मिळाली. या विभागामुळे कर्करोगाच्या निदानासोबतच एन्डोक्रिनोलॉजी, थायरॉईड, मूत्रपिंड प्रत्यारोपण, न्युरोलॉजी व हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांसाठी हा विभाग वरदान ठरणार होता. परंतु आता वर्ष होऊनही या विभागाच्या संदर्भात सर्व हालचाली थंडबस्त्यात पडल्या आहेत. यामुळे ‘न्युक्लिअर मेडिसीन’ची प्रतीक्षा कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्यावरील उपचाराचा यशाचा दर वाढतो. शिवाय उपचाराचा खर्च कमी होतो. परंतु शासकीय रुग्णालयात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांना याचे निदान करण्यासाठी खासगीचा रस्ता धरावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘न्युक्लिअर थेरपी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही उपचारपद्धती एक्स-रे व सीटीस्कॅन यांच्या निदान उपचारपद्धतीपेक्षा वेगळी आहे. यात ‘गॅमा कॅमेरा’च्या माध्यमातून कर्करोग आहे किंवा नाही, कर्करोग झाला असल्यास देत असलेल्या उपचाराला किती प्रतिसाद मिळतो आहे, नेमक्या किती पेशी बाधित आहेत, याचे सूक्ष्म निरीक्षण या ‘न्युक्लिअर मेडिसीन’मध्ये होते. एखाद्या अवयवाला बाधा झाली असेल तर त्याचा किती भाग निकामी झाला आहे किंवा चांगला आहे, तसेच उपचारामुळे किती प्रमाणात सुधारणा होते आहे या सर्व बाबींचे या उपचारपद्धतीमधून माहिती होते. हृदयरोग, एन्डोक्रिनोलॉजी, थायरॉईड, मूत्रपिंड प्रत्यारोपण, न्युरोलॉजी बाबतही असेच आहे. या नव्या विभागासाठी २०१७-१८ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली. नंतर हा प्रस्ताव शासकीय मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला, परंतु नंतर या प्रस्तावाचा पाठपुरावाच करण्यात आला नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

-हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ठरणार होते वरदान

हृदयविकाराच्या धक्क्यानंतर हृदयाच्या स्नायूंची स्थिती कशी आहे, किती स्नायू मृत झाले आहेत याचा अचूक अंदाज ‘न्युक्लिअर मेडिसीन’मधून मिळतो. स्नायू मृत झाले असतील तर ‘स्टेंट’चा काही उपयोग होत नाही. एकूणच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार होते. शिवाय, या अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधीही उपलब्ध होणार होत्या. परंतु या सर्वांनाच आता ग्रहण लागले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य