शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

कशी विझणार आग?

By admin | Updated: May 24, 2014 01:12 IST

शहरात आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. परंतु त्यावर नियंत्रण ठेवणार्‍या अग्निशमन दलाच्या क्षमतेत मात्र घट होत चालली आहे. परिस्थिती इतकी विकोपाला गेली आहे की, आग लागल्यास अग्निशमन

 अग्निशमन यंत्रणा अपुरी : सुरक्षा उपराजधानीची

नागपूर : शहरात आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. परंतु त्यावर नियंत्रण ठेवणार्‍या अग्निशमन दलाच्या क्षमतेत मात्र घट होत चालली आहे. परिस्थिती इतकी विकोपाला गेली आहे की, आग लागल्यास अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचायलाच खूप उशीर होतो. अग्निशमन स्टेशनची संख्यासुद्धा वाढलेली नाही. २५ लाखांची लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ ८ अग्निशमन स्टेशन आहेत. इतकेच नव्हे तर शहरात बहुमजली इमारतींची संख्यासुद्धा झपाट्याने वाढत आहे. लोकमतने दोन दिवसांपूर्वीच महापालिकेला मोठी आग लागण्याची प्रतीक्षा असल्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. असे असतानाही अग्निशमन दलाला सक्षम करण्यासाठी महापालिका गंभीर नाही. अशा परिस्थितीत आग विझणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आगीवर नियंत्रणासाठी हे आवश्यक लिफ्टची भिंत दोन तासापर्यंत आगीशी लढण्यास सक्षम असावी. लिफ्टच्या वरच्या भागात ०.२ वर्ग मीटर जागा असावी. ंलिफ्टमधील मोटार रूम योग्य ठिकाणी असावी. लँडिंग डोर आग प्रतिरोधक (किमान एक तासापर्यंत) असावे. ं रांगेत चार किंवा त्यापेक्षा अधिक लिफ्ट असू नये. असेलच तर दोन लिफ्टमधील भिंतीची आग प्रतिरोधक क्षमता दोन तास एवढी असावी. ं‘लिफ्ट कार डोअर’ची आग प्रतिरोधक क्षमता किमान अर्धा तास असणे आवश्यक आहे. आगीपासून संरक्षण करणार्‍या गेटला प्राथमिकता द्यावी. ंलिफ्टमध्ये टेलिफोनची सुविधा असावी. सोबतच कम्युनिकेशन सिस्टीमला फायर कंट्रोल रूमसोबत जोडण्यात यावे. ंबहुमजली इमारतीमध्ये एक फायर लिफ्ट असणे आवश्यक आहे. या लिफ्टमधील क्षेत्र १.४ वर्ग मीटर असावे. ८ व्यक्ती किंवा ५४५ किलो क्षमतेची लिफ्ट असावी. ंक्लोजिंग डोअरची रुंदी ०.८ मीटर असणे बंधनकारक आहे. फायर लिफ्टसाठी विजेची जोडणी इमारतीच्या वीज जोडणीपासून वेगळी असावी. ंवीजपुरवठा बंद झाल्यास, त्यात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था असावी. बांधकाम ंघर बांधकामात उपयोग करण्यात येणार्‍या वस्तू या भारवहन करण्यास सक्षम असाव्यात. पायर्‍या किंवा कॉरिडोर रुंद असावेत. ंघरातील अंतर्गत सजावट करताना ज्वलनशील पदार्थांचा उपयोग करण्यात येऊ नये. आतील भिंती व पायर्‍यांना मजबुती प्रदान करणार्‍या विटांचाच उपयोग करण्यात यावा. किमान दोन तासापर्यंत आगीपासून संरक्षण करू शकतील. ंपायर्‍या हवेशीर आणि ०.५ वर्ग मीटर रुंद असाव्यात. ‘ग्लेज्ड ब्रिक्स’चा उपयोग केल्यास कमीत कमी दोन तासापर्यंत आगीपासून लढण्यास सक्षम असावे.