फडणवीसांचा पुतण्या ‘लसवंत’ कसा झाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:00+5:302021-04-20T04:10:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे रेमडेसिविरच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने ...

How did Fadnavis' nephew become 'Laswant'? | फडणवीसांचा पुतण्या ‘लसवंत’ कसा झाला?

फडणवीसांचा पुतण्या ‘लसवंत’ कसा झाला?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकीकडे रेमडेसिविरच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. त्यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी ‘कोरोना’ची लस घेतल्याचा फोटो ‘व्हायरल’ झाला आहे. त्यांचे वय ४५ च्या वर नसतानादेखील त्यांना लस कशी काय मिळाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला. रात्री ‘इन्स्टाग्राम’वरून तो ‘फोटो’ हटविण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन ठेवले होते. यावरून काँग्रेसने फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट असतानादेखील फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळाली. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा, मग इतर लोक काय किड्यामुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने ‘टि्वटर’वर उपस्थित केला.

यासंदर्भात ‘लोकमत’ने तन्मय फडणवीस यांचे वडील अभिजित फडणवीस यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही व त्यानंतर त्यांचा फोन ‘स्वीच ऑफ’ होता.

Web Title: How did Fadnavis' nephew become 'Laswant'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.