शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकमुक्त नागपूर होणार कसे?

By admin | Updated: May 16, 2016 02:57 IST

उपराजधानीला ‘प्लॅस्टिकमुक्त’ शहर करण्याचे मोठमोठे दावे महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले.

मनपाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदच नाही : चार वर्षांत पावणेतीन हजार जणांवर कारवाई नागपूर : उपराजधानीला ‘प्लॅस्टिकमुक्त’ शहर करण्याचे मोठमोठे दावे महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले. प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर नियंत्रण राहावे यासाठी मनपा आयुक्तांनी अधिसूचनादेखील प्रकाशित केली होती. परंतु प्रत्यक्षात शहर ‘प्लॅस्टिकमुक्त’ राहावे यासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूदच करण्यात आलेली नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत शहरातील प्लॅस्टिकबंदीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. प्लॅस्टिकमुक्त नागपूरसाठी झालेले प्रयत्न, झालेली कारवाई, दंड, अर्थ संकल्पातील तरतूद इत्यादींसंदर्भात त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार ‘प्लॅस्टिकमुक्त’ शहर राहावे यासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात कुठलीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागाच्या तरतूदीमधून याबाबतचा खर्च करण्यात येतो. २०१५-१६ या कालावधीत याअंतर्गत ४८,५०० रुपयांचा खर्च करण्यात आला. शहरातील ‘प्लॅस्टिक’च्या कचऱ्यावर नियंत्रण राहावे यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी २९ आॅक्टोबर २०१५ रोजी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोल किंवा ‘प्लॅस्टिक’च्या वस्तूंची साठवणूक, वापर, विक्री दंडनीय अपराध असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळेस पाच हजार, दुसऱ्या वेळेस दहा हजार आणि तिसऱ्या वेळेस २५०० रुपये दंडासह कैदेची शिक्षा होऊ शकते. अधिसूनचने विदर्भ प्लॅस्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनने न्यायालयात आव्हान दिले होते.दरम्यान, ‘प्लॅस्टिक’संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २, ८३८ जणांवर गेल्या चार वर्षात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५०६ किलो ६८० ग्रॅम वजनाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. तर १६ लाख १० हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकट्या नोव्हेंबर २०१५ मध्ये १६३ व्यक्तींवर कारवाई झाली व १ लाख ३९ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.(प्रतिनिधी)