शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांनी वाढविला बीपी

By admin | Updated: July 22, 2014 00:56 IST

धंतोली शहरातील उच्चभ्रू लोकांच्या निवासस्थानांचा परिसर म्हणून ओळखले जातो. एकेकाळी येथे विस्तीर्ण जागेत पसरलेले बंगले असायचे. परंतु आज या बंगल्याच्या जागी टोलेजंग इमारती झाल्या आहेत.

चेन स्नॅचर्सचा धसका : चोऱ्या वाढल्या आनंद डेकाटे - नागपूर धंतोली शहरातील उच्चभ्रू लोकांच्या निवासस्थानांचा परिसर म्हणून ओळखले जातो. एकेकाळी येथे विस्तीर्ण जागेत पसरलेले बंगले असायचे. परंतु आज या बंगल्याच्या जागी टोलेजंग इमारती झाल्या आहेत. या इमारतींमध्ये बहुतांश खासगी रुग्णालये थाटण्यात आली आहेत. रुग्णालयांचा परिसर म्हणूनही धंतोलीला ओळखले जाते. या रुग्णालयांमुळे कायदेशीर प्रकरणांच्या संख्येत वाढ झाल्याने पोलिसांच्या दृष्टीने नवीनच समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयांनी धंतोली पोलिसांचे ‘ब्लड प्रेशर’ वाढविले आहे. नागपूर शहर हे मेडिकल हब म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी दूरवरून लोक येतात. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील रुग्णांचा सर्वाधिक समावेश असतो. शहरातील बहुतांश खासगी रुग्णालये ही धंतोली परिसरात एकवटली आहेत. त्यामुळे बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे बस्तान धंतोली परिसरातच असते. अपघातात जखमी झालेले, जळालेले रुग्ण येथे उपचारासाठी आणले जातात. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यास धंतोली पोलिसांना सूचना केली जाते. तक्रार नोंदविल्यानंतर रुग्णांचे नातेवाईक आपापल्या राज्यात, गावी निघून जातात. परंतु संबंधित प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांच्या साक्षीपुराव्यासाठी किंवा तपासाच्या दृष्टीने धंतोली पोलिसांना मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा जिल्ह्यातील दूरवरच्या गावांमध्ये चकरा माराव्या लागतात. धंतोली पोलिसांचा बहुतांश वेळ यातच जात असतो. अनेकदा तर साक्षीदार त्याच्या मूळ गावातच राहत नाही. अशावेळी त्यांना शोधून काढणे अवघड ठरते. मनुष्यबळाची गरज धंतोली पोलीस ठाण्यामध्ये एकूण १०५ पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत. यामध्ये दोन पोलीस निरीक्षक, चार एपीआय, चार पीएसआय, तीन एएसआय, २१ हवालदार, १८ एनपीसी, ३३ पीसी आहेत. एकूण १२३ जागा मंजूर आहेत. त्यापैकी ही संख्या कमी आहे. पोलीस ठाण्याचा वाढलेला व्याप लक्षात घेता, किमान रिक्त जागा तरी भरण्याची गरज आहे. २८८ हॉस्पिटल्सधंतोली परिसरात जवळपास २८८ रुग्णालये आहेत. यामध्ये कर्करोगापासून तर पोटाच्या विकारापर्यंत आणि बालरोग, स्त्रीरोगापासून तर नेत्ररोगापर्यंत सर्वच प्रकारची रुग्णालये आहेत. टोलेजंग इमारतींमध्ये असलेल्या या रुग्णालयांपैकी बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची जागा नाही. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्यांना रस्त्यावरच वाहन पार्क करावे लागते. रुग्णालयांमुळे येथे ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढल्याने धंतोलीतील रस्ते आता लहान पडू लागले आहेत. वाहनांमुळे आणखीनच त्रास होतो. यातच वाहन चोरीच्या घटनाही वाढलेल्या आहेत. ७.१० चौरस किलोमीटरचा परिसर धंतोली पोलीस ठाणेचा संपूर्ण परिसर ७.१० चौरस किलोमीटर येतो. यामध्ये आनंद टॉकीज पूल ते नरेंद्रनगर पूल, नरेंद्रनगर पूल ते आॅरेंजसिटी सर्कल, आॅरेंजसिटी ते बजाजनगर, बजाजनगर ते लोकमत चौक, लोकमत चौक ते मुंजे चौक, मुंजे चौक ते आनंद टॉकीज चौक असा हा परिसर आहे. कुंभारटोली आणि तकिया या दोन झोपडपट्ट्यासुद्धा धंतोली पोलीस ठाणे हद्दीत येतात. दुचाकी चोर व चेन स्नॅचर्सचा हैदोस खून, दरोडे, मारामारीसारखे गुन्हे या परिसरात कमी असले तरी मागील काही वर्षांमध्ये दुचाकी चोर आणि चेन स्नॅचर्सने चांगलाच हैदोस घातला आहे. त्यासोबत आर्थिक फसवणुकीचे गुन्हेसुद्धा प्रचंड होत असतात. बहुतांश उच्चभ्रू लोकांची ही वस्ती असून मध्य भागाचा परिसर असल्याने आपले काम फत्ते करून सहजपणे पळून जाता येत असल्याने चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले आहे. यातही लक्ष्मीनगर, नरेंद्रनगर आणि नीरी कॉलनी वसाहत हे परिसर चेन स्नॅचर्सचे टारगेट आहेत. यासोबतच चोरी, घरफोडीच्या घटनाही वाढलेल्या आहेत. तुरुंगातील कैद्यांचाही भार धंतोली पोलीस ठाणे हद्दीत नागपूर मध्यवर्ती कारागृह येत असल्याने कारागृहातील कैद्यांचा भारसुद्धा धंतोली पोलिसांनाच उचलावा लागतो. एखाद्या कैद्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्याच्याशी संबंधित कुठलेही प्रकरण असल्यास धंतोली पोलिसांना आपली भूमिका पार पाडावीच लागते. यासोबतच फुड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे गोडाऊन, अजनी रेल्वे स्थानक, नीरी ही राष्ट्रीय संशोधन संस्था, त्यातील कर्मचाऱ्यांची वसाहत हे महत्त्वाचे क्षेत्रही धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतच येतात.