लक्ष्मीभुवन चौकातील हुक्का पार्लरवर धाड; हुक्का पॉट, फ्लेवर्ड तंबाखू जप्त

By योगेश पांडे | Updated: August 2, 2023 16:58 IST2023-08-02T16:58:22+5:302023-08-02T16:58:39+5:30

सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Hookah Parlor in Laxmibhuvan Chowk raided; Hookah pot, flavored tobacco confiscated | लक्ष्मीभुवन चौकातील हुक्का पार्लरवर धाड; हुक्का पॉट, फ्लेवर्ड तंबाखू जप्त

लक्ष्मीभुवन चौकातील हुक्का पार्लरवर धाड; हुक्का पॉट, फ्लेवर्ड तंबाखू जप्त

नागपूर : लक्ष्मीभुवन चौकातील एका कॅफेमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या कॅफेवर धाड टाकल्यावर पोलिसांना ग्राहक हुक्का पिताना आढळून आले. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.

शहरात कॅफेच्या आड हुक्का पार्लर्स सुरू असून त्यावर कठोर कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्तांनी काही दिवसांअगोदर दिल्या होत्या. गोतमारे कॉम्प्लेक्स येथील दुसऱ्या माळ्यावरील क्युबा स्पोर्ट्स कॅफे ॲंड लॉंज येथे हुक्का पार्लर सुरू असल्याची गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली. बुधवारी मध्यरात्री १.२० वाजता पोलिसांनी तेथे धाड टाकली. त्यावेळी तेथे हुक्का विक्री सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथून हुक्का पॉट, फ्लेवर्ड तंबाखू जप्त केले. पोलिसांनी अफराज आसिफ धनडाला (२३, कावरपेठ, रामसुमेर बाबा नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Hookah Parlor in Laxmibhuvan Chowk raided; Hookah pot, flavored tobacco confiscated