बाेरडा शिवारात हाेमगार्डची हत्या, मध्य प्रदेशात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 15:40 IST2023-10-11T15:39:17+5:302023-10-11T15:40:04+5:30

आराेपीचा शाेध सुरू : खुनाचे कारण अस्पष्ट

Homeguard killed in Borda Shiwar, body found in Madhya Pradesh | बाेरडा शिवारात हाेमगार्डची हत्या, मध्य प्रदेशात आढळला मृतदेह

बाेरडा शिवारात हाेमगार्डची हत्या, मध्य प्रदेशात आढळला मृतदेह

कन्हान (नागपूर) : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील बाेरडा शिवारात असलेल्या टाेल नाक्याजवळील बेंचवर मंगळवारी (दि. १०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास हाेमगार्डला काठ्यांनी जबर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी आराेपीने मृतदेह मध्य प्रदेशात नेला. मात्र, काही तासात खून झाल्याचे उघड झाले आणि पाेलिसांनी मृतदेह मध्य प्रदेशातून ताब्यात घेतला.

आशिष दिलीप पाटील (२७, रा. न्यू गोंडेगाव, ता. पारशिवणी) असे मृताचे नाव आहे. आशिष पारशिवणी पाेलिस ठाण्यात हाेमगार्डपदी कार्यरत हाेता. मंगळवारी दुपारी बाेरडा शिवारातील न्यू गाेंडेगाव फाट्याच्या परिसरात असलेल्या बेंचवर व खाली जमिनीवर माेठ्या प्रमाणात रक्त सांडले असल्याचे नागरिकांना दिसले. त्यामुळे त्यांनी लगेच पाेलिसांना माहिती दिली.

ठाणेदार सार्थक नेहते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. तिथे एमएच-४० सीके-६०७८ क्रमांकाची माेटारसायकल चावीसह आढळून आली. ती माेटारसायकल आशिषची असल्याचे स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी त्याचा शाेध घ्यायला सुरुवात केली. शेवटी त्याचा मृतदेह मध्य प्रदेशात नेल्याचे स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी मागाेवा घेत मृतदेह ताब्यात घेतला व कन्हान पाेलिस ठाण्यात आणला. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून, कुणी व का केला, हे आराेपीला अटक केल्यानंतर कळेल, अशी माहिती ठाणेदार सार्थक नेहते यांनी दिली. या प्रकरणात वृत्त लिहिस्ताेवर गुन्ह्याची नाेंद करण्यात आली नव्हती.

पंक्चर कारमध्ये हाेता मृतदेह

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पाेलिसांनी या भागातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली. त्यामुळे आराेपी गाेंदियाच्या दिशेने गेल्याचा सुगावा लागल्याने पाेलिसांनी मागाेवा घेतला. मध्य प्रदेशातील तिडंगी भागातील कटंगी परिसरात उभ्या असलेल्या एमएच-३१/सीएन-६२४० क्रमांकाच्या कारमध्ये मृतदेह आढळून आला. त्या कारचे चाक पंक्चर झाल्याने तसेच कारमध्ये एक्स्ट्रा स्टेपनी नसल्याने आराेपीने मृतदेहासह कार वाटेत साेडून पळ काढला. त्यामुळे पाेलिसांनी ती कार जप्त केली.

Web Title: Homeguard killed in Borda Shiwar, body found in Madhya Pradesh