लाव्हा येथे घरफाेडी, घरगुती साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:47+5:302021-06-24T04:07:47+5:30

वाडी : अज्ञात चाेरट्याने कुलूपबंद घरात घरफाेडी करीत घरगुती साहित्य चाेरून नेले. ही घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील लाव्हा ...

Home burglary at Lava, household material lampas | लाव्हा येथे घरफाेडी, घरगुती साहित्य लंपास

लाव्हा येथे घरफाेडी, घरगुती साहित्य लंपास

वाडी : अज्ञात चाेरट्याने कुलूपबंद घरात घरफाेडी करीत घरगुती साहित्य चाेरून नेले. ही घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील लाव्हा येथे मंगळवारी (दि.२२) रात्रीच्या सुमारास घडली.

लाव्हा येथील धर्मेंद्र सिंह (रा. प्लाॅट नं. २०२, नागरिक गृहनिर्माण संस्था, लाव्हा) हे आपल्या कुटुंबीयांसह उत्तर प्रदेशमधील बिजनाैर येथे गेले आहेत. घराला कुलूप असल्याचा फायदा घेत अज्ञात चाेरट्याने दाराचे कुलूप ताेडून घरात प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून काही साहित्य चाेरून नेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसून आल्याने शेजाऱ्यांनी सिंह यांना फाेन करून सूचना दिली. सिंह यांचे नातेवाईक प्रवीण सिंह यांनी घटनेची सूचना पाेलिसांना दिली. लगेच पाेलीस उपनिरीक्षक संताेष उपाध्याय यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. घरमालक धर्मेंद्र सिंह गावाहून आल्यानंतर चाेरीला काय गेले, हे उघड हाेईल. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास उपनिरीक्षक संताेष उपाध्याय करीत आहेत.

===Photopath===

230621\img-20210623-wa0173.jpg

===Caption===

फोटो

Web Title: Home burglary at Lava, household material lampas