शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवाद्यांच्या आंदोलनात वीजबिलाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:09 IST

नागपूर : विदर्भ राज्यनिर्मितीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या ठिय्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शनिवारी शेकडो वीजबिलांची जाहीर ...

नागपूर : विदर्भ राज्यनिर्मितीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या ठिय्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शनिवारी शेकडो वीजबिलांची जाहीर होळी करून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. कोरोनाकाळातील वीजबिलमाफी न झाल्याच्या निषेधार्थ महिला आघाडीच्या पुढाकाराने हे आंदोलन झाले.

विदर्भ राज्य मागणीसह इंधन दरवाढ आणि वीजबिलमाफी या आंदोलनातील दोन प्रमुख मागण्या होत्या. त्या केंद्रस्थानी ठेवूून राज्य महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे यांच्या पुढाकारात हे आंदोलन झाले. ‘दिल्‍लीत वीज स्‍वस्‍त, महाराष्‍ट्रात जनता दरवाढीने त्रस्‍त’ असा नारा देत घोषणाबाजी करून महिला कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात प्रामुख्‍याने सुनीता येरणे, रेखा निमजे, उषा लांबट, ज्‍योती खांडेकर, वीणा भोयर, जया चातुरकर, शोभा येवले, संगीता अंबारे, सुहासिनी खडसे, कुंदा राऊत, प्रभा साहू, कोमल दुरूगकर, माया बोरकर आदी महिला सहभागी झाल्‍या होत्‍या.

आज ॲड. वामनराव चटप आणि राम नेवले यांच्यासह मुकेश मासुरकर, सुखदेव पातरे, ज्‍योती खांडेकर, ॲड. अजय चमेडिया, अरुण जोग, गोविंदराव चिंतेवार, अशोक हांडे, राजेंद्र आगरकर, अजय शाहू, प्‍यारूभाई आदींची भाषणे झाली.

...

...तर महिला चोप देतील - रंजना मामर्डे

कोरोना ही देशावर आलेली आपत्ती होती. सरकारी बंधनांमुळे या काळात उद्योग, व्‍यापार, शेती, रोजगार नसल्‍यामुळे जनतेची क्रयशक्‍ती संपली. त्‍यातच वीजबिल वाढवून राज्‍य सरकारने जनतेची लुटमार चालवली आहे. वीजकनेक्‍शन कापणे बंद करावे, बिल माफ करावे, अन्‍यथा वीज महावितरणच्‍या कर्मचाऱ्यांना विदर्भातील महिला चोप देतील, असा इशारा रंजना मामर्डे यांनी दिला.

...

आज अन्‍नत्‍याग आंदोलन

आंदोलनाच्‍या सातव्‍या दिवशी १५ ऑगस्‍टला विदर्भ राज्‍य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अन्‍नत्‍याग आंदोलन करणार आहेत. सकाळी १० वाजेपासून उपोषणाला प्रारंभ होईल. दुपारी ३ वाजता कार्यकारिणीची बैठक होणार असून त्‍यात आंदोलनाच्‍या दुसऱ्या टप्‍प्‍याची घोषणा केली जाईल.

...