शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट :  हातावर पोट असणाऱ्यांसाठी धर्मादाय संस्थांचा पैसा वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 23:42 IST

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे मजूर बेरोजगार झाले असून ते आपापल्या कुटुंबीयांसह घरी जाण्यासाठी घोळक्याने रोडवर निघाले आहेत. परिणामी, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती आहे. त्यांच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा व औषधोपचाराची सोय करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायदा व वक्फ कायद्यांतर्गत नोंदणीकृत धर्मादाय संस्थांकडील पैसे अशा सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा सरकारला व धर्मादाय आयुक्तांना अधिकार आहे.

ठळक मुद्देआवश्यक कार्यवाही करण्याचे  राज्य सरकारला आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे मजूर बेरोजगार झाले असून ते आपापल्या कुटुंबीयांसह घरी जाण्यासाठी घोळक्याने रोडवर निघाले आहेत. परिणामी, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती आहे. या मजुरांना आहे त्या ठिकाणी थांबवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा व औषधोपचाराची सोय करणे गरजेचे आहे. त्याकरिता मोठा निधी उभारावा लागणार आहे. महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायदा व वक्फ कायद्यांतर्गत नोंदणीकृत धर्मादाय संस्थांकडील पैसे अशा सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा सरकारला व धर्मादाय आयुक्तांना अधिकार आहे. सरकारने हा पैलू तपासून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयात सरकारी रुग्णालयांच्या विकासासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यात सध्या कोरोना नियंत्रणाचा मुद्दा हाताळला जात आहे. न्यायालयाने मजुरांच्या स्थलांतराची स्वत:हून दखल घेऊन हा आदेश दिला. कोरोना नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने देशभर लॉकडाऊन लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व यंत्रणा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यांचे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांतील हजारो मजूर होते. तसेच, महाराष्ट्रातील एका शहरातील मजूर दुसºया शहरात काम करण्यासाठी गेले होते. ते सर्व मजूर आता कुटुंबीयांसह आपापल्या घरी जाण्यासाठी रोडवर आले आहेत. त्यांना थांबवणे कठीण झाले आहे. हे स्थलांतर कोरोनाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरू शकते. उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. या मजुरांची व्यवस्था करण्यासाठी सरकारला मोठा निधी लागणार आहे. केवळ सरकारला एवढा मोठा खर्च करणे अशक्य होऊ शकते. करिता, सरकारने आपल्या अधिकाराचा वापर करून धर्मादाय संस्थांना आर्थिक योगदान देण्याचे निर्देश द्यावे, असे न्यायालयाने सांगितले. तसेच, यासंदर्भातील कायदेशीर तरतुदी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या