शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

'कूल लाइफस्टाइल'च्या नादात 'हाय क्लास' झिंग; सायकोट्रॉपिक ड्रग्जचा वाढता शिरकाव ही धोक्याची घंटी

By योगेश पांडे | Updated: May 11, 2026 14:10 IST

Nagpur : नागपुरातील एलएसडी प्रकरणात अभियांत्रिकीचे विद्यार्थी अटक झाल्याने ही समस्या थेट शिक्षित आणि उच्चभ्रू वर्गापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.

डॉ. योगेश पांडे
नागपूर :
केकाळी मुंबई, गोवा किंवा बेगलुरूसारख्या महानगरांपुरती मर्यादित मानली जाणारी 'पार्टी ड्रग्ज' संस्कृती आता नागपूरसारख्या शहरातही शिरली आहे. एलएसडी, एमडी, कोकेन, एक्स्टसी यांसारखी महागडी आणि तथाकथित 'हाय-प्रोफाइल' ड्रग्ज आता उपराजधानीतील कॉलेज परिसर, फार्महाऊस पार्ष्या, पब संस्कृती आणि श्रीमंत तरुणांच्या वर्तुळात पोहोचल्याचे वास्तव धक्कादायक आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्रथमच एलएसडी डॉट्स जप्त झाल्यानंतर शहरातील 'पार्टी कल्चर' कुठल्या दिशेला जात आहे, हा मोठा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. प्रश्न केवळ ड्रग्जचा नाही, तर समाजाच्या बदलत्या मानसिकतेचा आहे.

नागपूरसारख्या शहरात एलएसडीचा शिरकाव होणे म्हणजे केवळ गुन्हेगारी वाढणे नव्हे; तर पैसा, दिखावा, स्वैराचार, सोशल मीडिया यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या नव्या सामाजिक विकृतीचे ते लक्षण आहे. पूर्वी ड्रग्ज म्हणजे झोपडपट्टी, गुन्हेगार किंवा अंधाऱ्या गल्लीबोळातील व्यवहार अशी प्रतिमा होती. आता परिस्थिती उलटी झाली आहे. महागड्या कार, ब्रेडेड कपडे, फार्महाऊस पार्ष्या, डीजे नाईट्स आणि कूल लाइफस्टाइलच्या नावाखाली ड्रग्जला ग्लॅमर मिळत आहे. एलएसडीसारखे ड्रग्ज हाय क्लास नशा म्हणून विकले जात आहेत.

'शॉर्ट कट मनी'च्या नादात तरुण बनताहेत पेडलर्स

अमली पदार्थाच्या तस्करीत अनेक शिक्षित तरुणदेखील सहभागी आहेत. यामागे प्रचंड अर्थकारण दडलेले आहे. एका छोट्याशा एलएसडी डॉटची किंमत दीड ते दोन हजार रुपये असते. कमी प्रमाणात मोठा नफा मिळत असल्याने तरुण सहज या जाळ्यात ओढले जात आहेत. काही जण 'फास्ट मनी'च्या मोहात पेडलर बनत आहेत. इंटरनेट, डार्क वेब, एन्क्रिप्टेड अॅप्स आणि ऑनलाइन पेमेंटमुळे ड्रग्जचे नेटवर्क अनेकदा पोलिसांच्या 'आऊट ऑफ रिच' राहत असल्याचे वास्तव आहे.

'लाइफस्टाइल'ची चुकीची संकल्पना धोकादायक

माझे आयुष्य, माझी मर्जी या स्वातंत्र्याच्या कल्पनेतून अनेक तरुण कोणत्याही मर्यादा स्वीकारायला तयार नाहीत. पालकांकडे पैसा आहे; पण मुलांसाठी वेळ नाही. सोशल मीडियावर पार्टी, दारू, नशा आणि उथळ प्रसिद्धीचे प्रदर्शन सातत्याने केले जाते. वेब सीरिज आणि चित्रपटांतही ड्रग्जला बंडखोरी, आधुनिकता किंवा एलिट संस्कृतीचे प्रतीक दाखवले जाते. परिणामी अनेक तरुणांना नशा ही गुन्हा नसून लाइफस्टाइल वाटू लागली आहे. हीच चुकीची संकल्पना नागपुरसारख्या तुलनेने लहान शहरांतदेखील रुजणे ही भविष्यासाठी निश्चितच धोक्याचे संकेत देणारी बाब आहे.

कोकेन, चरसपेक्षा रासायनिक ड्रग्जला मागणी

  • पार्टी ड्रग्जमध्ये सर्वसाधारणतः रासायनिक ड्रग्जचा वापर होतो व त्यांना सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस असे म्हणतात. यात प्रामुख्याने एलएसडीसह मेथाक्वॉलोन, एफेड्रीन, अॅम्फेटामाईन, केटामाईन, एटीएस, एमएडीएम, मॅन्ड्रेक्स यांचा समावेश होतो. एनसीआरबीच्या २०२४ च्या अहवालानुसार देशात वर्षभरात सात हजार किलोंहून अधिक सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस जप्त करण्यात आले.
  • कोकेन, चरस, हेरोईनपेक्षा या पार्टी ड्रग्जचा आकडा जास्त होता. सायकोट्रॉपिक पदार्थाचा सर्वात मोठा थोका म्हणजे ते थेट मेंदूच्या कार्यपद्धतीत हस्तक्षेप करतात.
  • हे पदार्थ शरीरातील न्यूरोट्रान्समीटरवर परिणाम करून 3 व्यक्तीला कृत्रिम आनंद, उत्तेजना, झोप, भ्रम किंवा तात्पुरती मानसिक शांतता देतात. पण हा परिणाम तात्पुरता असतो. काही वेळानंतर शरीराला त्याची सवय लागते आणि व्यक्ती अधिक प्रमाणात ड्रग्ज घेऊ लागते.
English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur grapples with rising 'high-class' drug culture, a dangerous trend.

Web Summary : Nagpur faces a growing party drug culture with LSD and other psychotropic substances infiltrating college circles and affluent youth. This trend, fueled by money, social media, and a distorted lifestyle concept, poses a significant threat, demanding urgent attention and preventive measures.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर