शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक ट्रान्सफर स्टेशन अस्तित्वातच आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST

इंदूरच्या धर्तीवर मनपाचा प्रस्ताव बारगळला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळण्यासाठी स्वच्छ व ...

इंदूरच्या धर्तीवर मनपाचा प्रस्ताव बारगळला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळण्यासाठी स्वच्छ व सुंदर नागपूर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची गरज विचारात घेता, इंदूर शहराच्या धर्तीवर नागपूर महापालिका प्रत्येक झोनस्तरावर कचरा संकलनासाठी हायटेक ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव होता. यासाठी यासाठी शहरात जागांचा शोधही घेतला होता. मात्र हा प्रस्ताव बारगळला आहे.

ट्रान्सफर स्टेशनसाठी जवळपास एक एकर जागेची आवश्यकता आहे. लकडगंज झोन वगळता अन्य झोनमध्ये महापालिकेच्या जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नासुप्र, कृषी विद्यापीठ तसेच महसूल विभागाच्या जागा ताब्यात घेण्याचा विचार होता. गाडीतील ओला व सुका कचरा थेट कंटेनरमध्ये टाकण्याची व्यवस्था निर्माण केली जाणार होती. यासाठी मनुष्यबळ कमी लागणार असल्याने भविष्यात कचरा संकलनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून करण्यात आला होता.

यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याने परिसरातील नागरिकांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही. ओला आणि सुका कचरा वाहून नेण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कंटेनरचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हा प्रस्ताव कागदावरच राहिला.

सध्या शहरातील घराघरातून गोळा केलेला कचरा साठविण्याची व्यवस्था नसल्याने तो भांडेवाडी येथे वाहून नेला जातो. कचरा साठविण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध नसल्याने काही प्रभागात तो रस्त्यावर जमा केला जातो. दुपारपर्यंत तो तसाच पडून असतो. त्यानंतर कंटेनरच्या माध्यमातून भांडेवाडी येथे नेला जातो. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होतो.

नासुप्रकडे केली होती जागांची मागणी

ट्रान्सफर स्टेशनसाठी मोठी जागा लागणार आहे. शहरात महापालिकेकडे अशा स्वरूपाच्या जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नासुप्रने आपल्या मालकीच्या जागा उपलब्ध कराव्यात. अशी मागणी महापालिकेने केली होती. तसेच

कृषी विद्यापीठ व महसूल विभागाकडे जागांची मागणी केली जाणार होती.