शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनासाठी ‘हायटेक’ पाऊल

By admin | Updated: December 3, 2015 03:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या हिवाळी परीक्षांतून एक नवा इतिहास निर्माण झाला आहे.

नागपूर विद्यापीठ : अद्ययावत मूल्यांकन केंद्राची वेगवान वाटचालनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या हिवाळी परीक्षांतून एक नवा इतिहास निर्माण झाला आहे. ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाच्या दृष्टीने विद्यापीठाने ‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. यासाठी परीक्षा भवनात अद्ययावत ‘स्कॅनिंग मशीन’ व संगणक संच असलेल्या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. येथे प्रचंड वेगाने उत्तरपत्रिकांचे ‘स्कॅनिंग’ करण्यात येत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी बुधवारी या केंद्राची पाहणी केली. अशाप्रकारचे अद्ययावत ‘स्कॅनिंग’ केंद्र उभारणारे नागपूर विद्यापीठ राज्यातील प्रथम विद्यापीठ ठरले आहे.राज्य शासनाच्या राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशींनुसार विद्यापीठात तंत्रज्ञानाच्या मदतीचे मूल्यांकन करण्यावर भर देण्याचे निर्देश राज्यपालांनीच दिले होते. त्यानुसार यंदाच्या सत्रापासून मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन सारे काही ‘आॅनलाईन’ करण्याचा विद्यापीठाने निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक असलेल्या या ‘स्कॅनिंग’ केंद्राची स्थापना ‘प्रोमार्क’च्या मदतीने करण्यात आली आहे. या केंद्रावर उत्तरपत्रिकांचे थेट ‘स्कॅनिंग’ होणार असून मूल्यांकनाची सुविधा राहणार आहे. ‘स्कॅनिंग’साठी ६० मशीन ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनासाठी ‘हायटेक’ पाऊलनागपूर : मूल्यांकनाच्या ‘स्कॅनिंग’साठी ६० मशीन लावण्यात आल्या आहेत. दिवसभरात २५ हजारांच्या जवळपास उत्तरपत्रिका ‘स्कॅन’ होऊ शकतात. परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांचे या केंद्रावर पूर्ण लक्ष राहणार असून भविष्यात आणखी संगणक बसविण्यात येणार आहेत.मूल्यांकनासाठी पाच केंद्रविद्यापीठाने उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनासाठी पाच केंद्र सुरू केली आहेत. यात रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यापीठ परिसर ग्रंथालय, अ‍ॅकेडॅमिक स्टाफ कॉलेजचा समावेश आहे. सध्या अभियांत्रिकी, विधी, औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या परीक्षांचे मूल्यांकन आॅनस्क्रीन करण्यात येत आहे. आॅनस्क्रीन मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना ‘डेमो’ दाखवून प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यांना या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करण्यासाठी दररोज विशिष्ट ‘पासवर्डह्ण दिल्या जातील. एका दिवशी एका प्राध्यापकाला केवळ ३० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करता येणार आहे. मात्र, या उत्तरपत्रिका सलग असल्याने त्या कोणत्या महाविद्यालयाच्या आहेत, हे कळणार नसल्याची माहिती देण्यात आली.तंत्रज्ञानाच्या युगात आता ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून जग अतिशय जवळ झाले आहे. माहितीची देवाणघेवाण वेगवान झाली आहे. विद्यार्थ्यांपर्यंत विद्यापीठातील विविध योजना, नियम, घोषणा, परीक्षांचे वेळापत्रक इत्यादींची माहिती तत्काळ पोहोचावी यासाठी विद्यापीठाने ‘एमकेसीएल’च्या मदतीने स्वत:चे ‘मोबाईल अ‍ॅप’ तयार केले आहे. या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे ‘अ‍ॅप’ बुधवारपासून ‘लॉन्च’ करण्यात आले आहे.या ‘अ‍ॅप’मुळे परीक्षेचे निकाल बघणे, अर्ज करणे यासह स्पर्धा परीक्षांची माहितीही विद्यार्थ्यांना केवळ एका ‘क्लिक’वर मिळणार आहे. शिवाय संलग्नित महाविद्यालयांमध्ये आयोजित झालेले किंवा करण्यात आलेले कार्यक्रम, चर्चासत्र इत्यादींची थेट माहिती मिळू शकणार आहे. (प्रतिनिधी)