मुलाच्या मित्रावर जडले तिचे प्रेम; ४८ व्या वर्षीय 'पत्नी' चढली प्रेमाच्या बोहल्यावर ! पतीने घातली मृत्यूला साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 20:28 IST2026-03-21T20:28:10+5:302026-03-21T20:28:47+5:30

Nagpur : पत्नीच्या शब्दाखातर त्याने खदाणीवर दगड फोडण्याचे काम हाती घेतले, दगड उसळला आणि त्याच्या दोन्ही डोळ्याची दृष्टी अंधुक झाली. ज्या पत्नीसाठी हा ५५ वर्षीय पती कायमचा अंध झाला, त्याच पत्नीने आता त्याला निष्ठुरपणे वाऱ्यावर सोडले.

Her love for her son's friend was aroused; 48-year-old 'wife' climbed on the love festivity! Husband called for death | मुलाच्या मित्रावर जडले तिचे प्रेम; ४८ व्या वर्षीय 'पत्नी' चढली प्रेमाच्या बोहल्यावर ! पतीने घातली मृत्यूला साद

Her love for her son's friend was aroused; 48-year-old 'wife' climbed on the love festivity! Husband called for death

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर :
पत्नीच्या शब्दाखातर त्याने खदाणीवर दगड फोडण्याचे काम हाती घेतले, दगड उसळला आणि त्याच्या दोन्ही डोळ्याची दृष्टी अंधुक झाली. ज्या पत्नीसाठी हा ५५ वर्षीय पती कायमचा अंध झाला, त्याच पत्नीने आता त्याला निष्ठुरपणे वाऱ्यावर सोडले. स्वतःची मुले लग्नाच्या वयाची असताना, ४८ वर्षीय माउलीचे मन चक्क स्वतःच्याच मुलाच्या २८ वर्षीय मित्रावर जडले. दोघांचा लपंडाव एकदा उघड झाला आणि ती पळून गेली, तरीही अंध पतीने तिला मोठ्या मनाने पुन्हा पदराखाली घेतले. मात्र, आठवडाभरापूर्वी ती पुन्हा त्याच तरुणासोबत पळाल्याने अभागा पती हतबल झाला. पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवूनही पत्नी परत येत नसल्याने खचलेल्या पतीने अखेरीस विष प्राशन करून मृत्यूला साद घातली. सध्या नागपूर मेडिकल रुग्णालयात त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. ही घटना भिवापूर शहरातील आहे.

या दुर्दैवी गृहस्थांचा संसार एकेकाळी सुखाचा होता. त्यांना अंदाजे २६, २४ आणि १८ वर्षाची तीन मुले आहेत. ५५ वर्षीय पती रोजमजुरी करून मुलांचे भविष्य घडवत होता. मात्र, काही वर्षापूर्वी पत्नीच्या सांगण्यावरून त्याने गिट्टी खदाणीवर जड काम स्वीकारले. दुर्दैवाने कामावर असताना डोळ्याला गिट्टी लागली आणि दोन्ही डोळ्यांची दृष्टी अंधुक झाली. नशिबी अंधार आला, तरीही खचून न जाता हातात काठी घेऊन शेळ्या चारून तो संसाराला हातभार लावत होता. दरम्यान, २४ वर्षीय मधल्या मुलाच्या एका २८ वर्षीय मित्राशी या ४८ वर्षीय माउलीचे सूत जुळले. ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याच मुलाच्या मित्रावर आईचे प्रेम जडावे, ही घटनाच समाजमनाला चटका लावणारी ठरली.

काही महिन्यांपूर्वी ही महिला त्या तरुणासोबत पळून गेली होती, मात्र दोन-चार दिवसांतच परतली. अंधार नशिबी असलेल्या पतीने पत्नीवर असलेल्या अतोनात प्रेमापोटी तिला पुन्हा स्वीकारले. तिला माफ करून पदराखाली घेतले. मात्र, प्रेमाची ही धून इतकी भयानक निघाली की, आठ दिवसांपूर्वी ती पुन्हा त्याच तरुणासोबत पळाली. पत्नी परत यावी म्हणून या दृष्टिहीन पतीने पोलिस स्टेशनच्या चकरा मारल्या, सामाजिक कार्यकर्त्याकडे साकडे घातले, पदर पसरला; पण या अतरंगी प्रेमापुढे कायद्याचे हातही तोकडे पडले.

पोरं उघड्यावर

आईने पोटच्या मुलाच्या मित्राचा हात धरल्याने हसत्या-खेळत्या कुटुंबाची दाणादाण उडाली आहे. मोठा मुलगा पोटापाण्यासाठी पुण्याला स्थायिक आहे, तर ज्याच्या सोबत आई पळाली, तो मधल्या मुलाचा मित्र निघाल्याने समाजात मोठी मानहानी झाली, त्यामुळे लोकांच्या टोमण्यांना कंटाळून हतबल झालेला मधला मुलगा कुटुंबापासून वेगळा राहतो, तर शिक्षण घेणारा लहान मुलगा आपल्या दृष्टिहीन पित्यासोबत असतो. आईच्या एका अतरंगी निर्णयाने आज रक्ताची नाती एकमेकांपासून दुरावली असून, संपूर्ण घर पोरकं झालं आहे.

Web Title : पत्नी बेटे के दोस्त के साथ भागी; पति ने आत्महत्या का प्रयास किया।

Web Summary : एक 55 वर्षीय अंधे व्यक्ति ने आत्महत्या का प्रयास किया क्योंकि उसकी 48 वर्षीय पत्नी उनके बेटे के 28 वर्षीय दोस्त के साथ भाग गई। पिछली बार माफ करने के बावजूद, वह फिर से चली गई, जिससे पति और परिवार तबाह हो गया। वह वर्तमान में नागपुर के एक अस्पताल में जीवन के लिए संघर्ष कर रहा है।

Web Title : Wife elopes with son's friend; husband attempts suicide.

Web Summary : A 55-year-old blind man attempted suicide after his 48-year-old wife ran away with their son's 28-year-old friend. Despite forgiving her previous elopement, she left again, leaving the husband and family devastated. He is currently battling for his life in a Nagpur hospital.