शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

संघ मुख्यालयाजवळ मनोरुग्णाचा हैदोस

By admin | Updated: August 27, 2016 01:54 IST

संघ मुख्यालयाजवळच्या इमारतीवर चढून एका मनोरुग्णाने गुरुवारी पहाटे प्रचंड हैदोस घातला.

टॉवरवर चढला तीन तास गोंधळ नागरिकांसोबत पोलिसांनाही धमक्यानागपूर : संघ मुख्यालयाजवळच्या इमारतीवर चढून एका मनोरुग्णाने गुरुवारी पहाटे प्रचंड हैदोस घातला. तब्बल तीन तास त्याने परिसरातील नागरिक आणि पोलिसांना धमक्या दिल्या. शेवटी त्याला कसेबसे ताब्यात घेऊन पोलिसांनी मनोरुग्णालयात दाखल केले. सुरेश सुदनलाल नेवारे (वय २७) असे त्याचे नाव असून, तो सिवनी (मध्यप्रदेश) जवळच्या ब्राह्मणी गावातील रहिवासी आहे.दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्यामुळे संघ मुख्यालयाला अतिउच्चदर्जाचे सुरक्षा कवच आहे. हे असताना घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. संघ मुख्यालयाजवळच्या मुधोजी मार्गावर विठ्ठलराव बावणे यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आरोपी सुरेश हा रेशीमबाग परिसरात फिरतो. गुरुवारी पहाटे २ च्या सुमारास तो बावणे यांच्या निर्माणाधीन इमारतीच्या टॉवरवर (चौथ्या माळ्यावर) चढला. त्याने तेथून आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाने कोतवाली पोलिसांना पहाटे ३च्या सुमारास माहिती देऊन घटनास्थळी पाठवले. पोलीस पोहचेपर्यंत तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मनोरुग्ण सुरेशच्या हातात लाकडाची जाडजूड फळी होती. तो खाली जमलेल्यांना शिवीगाळ करून धमक्या देत होता. पोलीस पोहचल्याचे पाहून त्याने जास्तच गोंधळ सुरू केला. इकडे (इमारतीवर) कुणी चढल्यास त्याला ठार मारेन, खाली उडी मारेन, अशी धमकीही देऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याची खाली उतरण्यासाठी मनधरणी सुरू केली. त्याची नजर चुकवून काही पोलीस टॉवरवर चढले आणि त्यांनी पहाटे ५ वाजता सुरेशला खाली उतरवले. त्यानंतर त्याला मेडिकलमध्ये नेण्यात आले. तो मनोरुग्ण असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्याच्याविरुद्ध मनोरुग्ण कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला. सुरेशने ठाण्यातही गोंधळ सुरू केला. तो काहीही करू शकतो, हे ध्यानात आल्याने पोलिसांनी त्याला मनोरुग्णालयात दाखल केले. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह संघ मुख्यालयावर यापूर्वी दहशतवादी हल्ला झाला असून, अनेक दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर संघ मुख्यालय आणि संघ प्रमुख आहेत. त्यामुळे संघ मुख्यालयाला आत-बाहेर त्रिस्तरीय उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. असे असताना या संवेदनशील स्थळाच्या बाजूलाच एका मनोरुग्णाने तब्बल तीन तास गोंधळ घातल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.