वीजांच्या कडकडाटासह नागपुरात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2022 18:24 IST2022-09-07T18:19:32+5:302022-09-07T18:24:44+5:30

वीजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावल्याने पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

Heavy rain in Nagpur with lightning strikes | वीजांच्या कडकडाटासह नागपुरात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

वीजांच्या कडकडाटासह नागपुरात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

नागपूर : दोन दिवसाआधी दमदार बरसल्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. तर आज (दि. ७) विजांच्या कडकडाटासह नागपुरात पुन्हा जोरदार सरी बरसल्या आहेत. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. कधी जोरदार पाऊस तर कधी कडक ऊन यामुळे नागरिक हैरान झाले आहेत. अशातच नागपुरात आज दिवसभर ऊन तापल्यानंतर संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. वीजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावल्याने पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

कोरोना काळातील लॉकडाऊननंतर यावर्षी सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. शहरामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांकडून देखावे पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र, आज आलेल्या अचानक पावसाने त्यांच्या तयारीवरही पाणी फेरले. 
 

Web Title: Heavy rain in Nagpur with lightning strikes