शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
"ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
3
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
4
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
5
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
6
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
7
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
8
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
9
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
10
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
11
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
12
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
13
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
14
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
15
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
16
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
17
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
18
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
19
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

द्वितीय अपीलावर संबंधित खंडपीठातच सुनावणी

By admin | Updated: May 18, 2014 00:50 IST

माहितीच्या अधिकारांतर्गत संंबधित द्वितीय अपील आणि तक्रारी आता ज्या खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाचे कार्यालय आहे, त्याच खंडपीठाने हाताळावीत,

 मुख्य माहिती आयुक्तांचा निर्णय : उच्च न्यायालयात आव्हान

नागपूर : माहितीच्या अधिकारांतर्गत संंबधित द्वितीय अपील आणि तक्रारी आता ज्या खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाचे कार्यालय आहे, त्याच खंडपीठाने हाताळावीत, असे आदेश राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी नुकतेच जारी केले आहेत. या निर्णयामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते मात्र नाराज झाले असून या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोकण, बृहन्मुंबई, पुणे आणि मुंबई येथे माहिती आयोगाचे खंडपीठ तयार करण्यात आले आहे. मुंबई येथे मुख्यालय आहे. माहितीचा अधिकाराचा कायदा लागू झाल्यापासून जागरुक नागरिकांकडून याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते यासाठी जागरूक आहेत. सर्वसामान्यपणे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्या खंडपीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये अपीलार्थी वास्तव्य करीत असेल त्याला आपल्याच खंडपीठामध्ये न्याय मागता येतो. हीच बाब माहिती आयोगासाठी सुद्धा लागू आहे. परंतु माहितीच्या अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १५ च्या पोटकलम (४) अन्वये मुख्य माहिती आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून उपरोक्त आदेश जारी केले असून या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, असेही स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील बहुतेक कार्यालयातील मुख्यालय हे मुंबईत आहे. त्यामुळे त्या कार्यालयाशी संबंधित माहितीबाबत द्वितीय अपील असल्यास त्यासाठी मुंबईलाच जावे लागणार आहे. यामुळे सामान्य अर्जदारावर शारीरिक, मानसिक व आर्थिक ताण पडणार आहे. त्यामुळे या निर्णयाने माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश बन्सोड यांनी यासंबंधात आयोगाला पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच अ‍ॅड. प्रदीप वाठोरे यांच्या माध्यमातून मुख्य आयुक्तांच्या उपरोक्त आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने यावर नोटीस जारी केली आहे. (प्रतिनिधी)