शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसे यांच्या अर्जांवर आज सुनावणी

By admin | Updated: March 2, 2017 02:31 IST

पुणे येथील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करीत असलेले सेवानिवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग

 चौकशी समितीची तारीख : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरण नागपूर : पुणे येथील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करीत असलेले सेवानिवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीसमक्ष माजी महसूल मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सादर केलेल्या दोन अर्जांवर उद्या, गुरुवारी सुनावणी होणार आहे. खडसे यांनी एका अर्जाद्वारे पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांना उलटतपासणीसाठी समितीसमक्ष हजर करण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या अर्जामध्ये चौकशी समितीने शासनाद्वारे निर्धारित कक्षा ओलांडल्याचा दावा करून चौकशीसाठी नव्याने मुद्दे निश्चित करण्याची विनंती करण्यात आली आहे. हे दोन्ही अर्ज मंगळवारी समितीसमक्ष सादर करण्यात आले. त्यानंतर समितीने या अर्जांवर बुधवारी सुनावणी करण्याचे सूचित केले होते. परंतु, बुधवारी समितीने काही कारणांमुळे सुनावणीसाठी गुरुवारची तारीख दिली. समितीने खडसे यांची तपासणी मंगळवारीच पूर्ण केली असून चौकशी येथेच संपते की लांबते हे अर्जांवरील निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून २०१६ रोजी ही समिती स्थापन करून चौकशी पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. दरम्यान, विविध कारणांनी समितीला तीनदा मुदतवाढ देण्यात आली. महसूल मंत्री असताना खडसे यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून भोसरी येथील ‘एमआयडीसी’ची जमीन अत्यंत कमी किमतीत म्हणजे, केवळ ३ कोटी ७५ लाख रुपयांत पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्या नावावर केली. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत यापेक्षा दहापट जास्त आहे, असा आरोप आहे. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर समिती स्थापन करण्यात आली. खडसे यांच्यातर्फे वरिष्ठ वकील एम. जी. भांगडे तर, ‘एमआयडीसी’तर्फे अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे कामकाज पहात आहेत.(प्रतिनिधी)