शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

मेडिकलमध्ये दारूच्या बॉटल्सचा ढीग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:20 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) परिसरात अधिष्ठाता कार्यालयाच्या मागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्देकार्यालयाच्या मागे टबभरून बॉटल्स : अधिष्ठात्यांनी घेतली गंभीर दखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय रुग्णालयात किंवा कार्यालयात मद्यपान करणे हा गुन्हा ठरतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) परिसरात मात्र दारूच्या बॉटल्स नेहमीच आढळून येतात. सोमवारी अधिष्ठाता कार्यालयाच्या मागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.मेडिकलमध्ये विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. शिवाय रुग्णालयाचा परिसर फार मोठा असल्याने सुरक्षा रक्षकांना सर्वच ठिकाणी लक्ष देणे अशक्य असते. याचा फायदा घेत काही रुग्णांचे नातेवाईक व समाजविघातक रुग्णालयाच्या परिसरात दारू पितात. काही वर्षांपूर्वी वॉर्डाच्या भागात दारूच्या रिकाम्या बॉटल्स सापडल्या. याची चर्चा झाल्याने सफाई कर्मचाऱ्यांनाही याबाबत जाब विचारण्यात आला होता. नंतर मुलांच्या वसतिगृहात दारूच्या बॉटल्स सापडल्यानेही मेडिकल चर्चेत आले होते. आता अधिष्ठाता कक्षाला लागून असलेल्या कार्यालयाच्या मागील परिसरात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्स आढळून आल्या. विशेष म्हणजे, कचऱ्याच्या टबवर स्वच्छ, सुंदर नागपूरचे स्लोगनही लिहिले आहे. एवढ्या मोठ्या संख्येत दारूच्या बॉटल्स आल्या कुठून, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराला अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले आहे. सफाई कर्मचाºयाने या बॉटल्स जमा केल्या असाव्यात, असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयliquor banदारूबंदी