प्रेयसीला मारून रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ झोपला; चारित्र्याच्या संशयावरून तिला केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:04 IST2026-03-11T16:03:26+5:302026-03-11T16:04:15+5:30

Nagpur : नारा गाव परिसरात महिलेच्या मृतदेहाचे गूढ उलगडले आहे. संबंधित महिलेची निघृण हत्या झाली असून, ती मजुरीचे काम करत होती. होळीच्या दिवशी घरातून बाहेर पडलेली महिला चार दिवसांपासून बेपत्ता होती.

He killed his girlfriend and slept next to her body all night; He brutally beat her up on suspicion of her character | प्रेयसीला मारून रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ झोपला; चारित्र्याच्या संशयावरून तिला केली बेदम मारहाण

He killed his girlfriend and slept next to her body all night; He brutally beat her up on suspicion of her character

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नारा गाव परिसरात महिलेच्या मृतदेहाचे गूढ उलगडले आहे. संबंधित महिलेची निघृण हत्या झाली असून, ती मजुरीचे काम करत होती. होळीच्या दिवशी घरातून बाहेर पडलेली महिला चार दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्यासोबत राहणाऱ्या महिलेने तिची ओळख पटविल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिला एका व्यक्तीसोबत अगोदर लिव्ह इनमध्ये राहत होती. मात्र तिच्या प्रियकराला तिचे आणखी कुणाशी प्रेमसंबंध असल्याची शंका आली व त्याने त्यातच तिची बेदम मारहाण करत हत्या केली.

दसिया रामचंद्र उईके (४५, छपारा, शिवनी, मध्य प्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. ही काही महिन्यांपासून नागपूरमध्ये मजुरीचे काम करत होती व एकटीच राहत होती. काही दिवसांनी ती गजानननगर परिसरात राहणाऱ्या आरती बल्लूप्रसाद धुर्वे (३२) हिच्यासोबत राहू लागली. दोघीही रोजंदारीच्या कामासाठी नारा गाव परिसरातील मजूर ठिय्यावर जायच्या ४ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता, होळीच्या दिवशी दसियाने आरतीला ती राजेंद्र यादव (शिवनी, मध्य प्रदेश) याच्या घरी जात असल्याचे सांगितले व ती घरातून निघून गेली. मात्र त्यानंतर ती परतलीच नाही. 

ती अनेकदा राजेंद्र यादवकडे जात होती. सुरवातीला ती कामानिमित्त बाहेर गेली असावी असे वाटल्याने आरतीने जास्त लक्ष दिले नाही. मात्र, ती परत न आल्याने ती काळजीत होती. त्यातच जरीपटका पोलिसांना एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. त्याबाबत चौकशी करत असताना पोलिसांनी आरतीला पोलिस ठाण्यात बोलावून मृत महिलेचा फोटो दाखविला. फोटो पाहिल्यानंतर आरतीने ती दसियाच असल्याचे सांगितले. तिचा मृतदेहदेखील आरतीला दाखविण्यात आला. त्यावरून तिची ओळख पटली. 

मृतदेहाजवळच झोपला आरोपी

४ मार्च रोजी रात्री यादवने दारूच्या नशेत दासियाशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने तिला शिवीगाळ केली आणि निर्दयपणे लाथा आणि ठोसे मारले. त्यात तिचा मृत्यू झाला. रात्री तो तिच्या मृतदेहाजवळच झोपी गेला. सकाळी शुद्धीवर आल्यानंतर त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने प्रतिसाद दिला नाही तेव्हा तो पळून गेला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक

अहवालानुसार, शरीरावर झालेल्या जोरदार मारामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा मृत्यू अपघाती नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. दसिया ही वारंवार राजेंद्र यादव याच्या घरी जात असल्याचे सांगितले असून, तिच्या हत्येमागे त्याचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलिसांनी यादवविरोधात गुन्हा नोंदविला आहे. आरतीचा मृतदेह सापडल्यापासून यादव बेपत्ता होता. तो गुन्ह्याच्या ठिकाणी असलेल्या खोलीत दासियासोबत राहत होता. जरीपटका पोलिसांनी सोमवारी शिवनी येथे छापा टाकला. यादवला तेथे ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने दासियाची हत्या केल्याची कबुली दिली.

Web Title : प्रेमी ने की प्रेमिका की हत्या, शव के पास सोया; शक बना वजह।

Web Summary : नागपुर: एक व्यक्ति ने अपनी लिव-इन पार्टनर, दसिया उइके की हत्या कर दी, उसे बेवफाई का शक था। उसने बेरहमी से पीटा, फिर उसके शव के पास सोया। पुलिस ने आरोपी राजेंद्र यादव को सिवनी में गिरफ्तार किया। उसने अपराध कबूल कर लिया।

Web Title : Jealous lover kills, sleeps by victim; suspicion fueled rage.

Web Summary : Nagpur: A man killed his live-in partner, Dasia Uike, suspecting infidelity. He brutally beat her, then slept next to her body. Police arrested the accused, Rajendra Yadav, in Seoni. He confessed to the crime.