रुचिताला दोन वर्षांपूर्वीही 'त्याने' केला होता मारण्याचा प्रयत्न; ओयो हॉटेलमध्ये बोलावून संशयातून केली प्रेयसीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:30 IST2026-01-24T14:28:54+5:302026-01-24T14:30:38+5:30

Nagpur : नागपूर-कळमेश्वर मार्गावरील फेटरी (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात असलेल्या ओयो हॉटेलमध्ये तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. २२) दुपारी घडली असून, शुक्रवारी (दि. २३) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

'He' had tried to kill Ruchita two years ago; Called her to Oyo Hotel and killed her lover out of suspicion | रुचिताला दोन वर्षांपूर्वीही 'त्याने' केला होता मारण्याचा प्रयत्न; ओयो हॉटेलमध्ये बोलावून संशयातून केली प्रेयसीची हत्या

'He' had tried to kill Ruchita two years ago; Called her to Oyo Hotel and killed her lover out of suspicion

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर :
नागपूर-कळमेश्वर मार्गावरील फेटरी (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात असलेल्या ओयो हॉटेलमध्ये तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. २२) दुपारी घडली असून, शुक्रवारी (दि. २३) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तिची हत्या प्रेमसंबंधातून करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला असून, कळमेश्वर पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

रुचिता राजेश भांगे (२१, रा. शिवमंदिराजवळ, वेलकम सोसायटी, जुनी वस्ती, बोरगाव, गिट्टीखदान) असे मृत तरुणीचे तर सौरभ ऊर्फ बिट्टू जामगडे (२५, रा. आष्टी, ता. नागपूर ग्रामीण) असे फरार आरोपीचे नाव आहे. रुचिता ही नागपूर शहरातील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये बीए अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. तिला महाराष्ट्र पोलिस दलात नोकरी करायची इच्छा असल्याने ती तयारी करीत होती.

ती गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घराबाहेर गेल्याची माहिती मिळताच वडिलांनी तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. ती पोलिस भरती सराव व क्लासला आली नसल्याचे मैत्रिणीने सांगताच कुटुंबीयांनी रात्री ११ वाजेपर्यंत प्रतीक्षा केली आणि घरी न आल्याने नंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलिस ठाण्यात नोंदविली होती. दरम्यान, ओयोमधील कर्मचाऱ्याने शुक्रवारी सकाळी पोलिसांना माहिती दिल्याने हा प्रकार उघड झाला. पोलिसांना पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक-१०५ मधील बेडवर रुचिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे आढळून आले. रजत शिंगणे याने या प्रकाराची माहिती रुचिताचे वडील रमेश भांगे यांना दिली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळ गाठून पाहणी केली व तपासासाठी आवश्यक असलेले नमुने घेतले. पंचनामा आटोपताच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी रमेश भांगे यांच्या तक्रारीवरून सौरभ जामगडे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. त्याच्या शोधात पोलिस पथके रवाना केल्याची माहिती ठाणेदार मनोज काळबांडे यांनी दिली.

दोन वर्षांपूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न

दोन वर्षापूर्वी आरोपी सौरभ हा नागपूर शहरातील रुचिताच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात येताच शेजारी तिच्या मदतीला धावले आणि त्यांनी सौरभला पळवून लावले होते. त्याच्या कुटुंबीयांना या प्रकाराबाबत माहिती देऊन समजावून सांगितल्यानंतर काही काळ प्रकरण शांत असल्याने फारशा घडामोडी झाल्या नाहीत.

चार दिवसांपूर्वी रुचिता मैत्रिणींसोबत पोलिस २ मुख्यालयाच्या क्रीडांगणावर पोलिस भरतीचा सराव करीत असताना सौरभ तिथे गेला होता. त्याने रुचिताला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली आणि तिचा मोबाइल पळवून नेला होता, अशी माहिती तिचे वडील रमेश भांगे यांनी पोलिसांना दिली.

दोघांचीही वाहने हॉटेलसमोर

मृत रुचिता व आरोपी सौरभ ओयो हॉटेलमध्ये त्यांच्या वाहनांनी आले होते. त्या दोघांचीही वाहने शुक्रवार सकाळपर्यंत हॉटेलसमोरच होती. तिची हत्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली आणि आरोपी त्याचे वाहन सोडून पळून गेला. तो हॉटेलबाहेर पडताना कुणालाही दिसला नाही. दोघांचीही वाहने उभी असल्याने तसेच खोलीचे दार बंद असल्याने ओयो कर्मचाऱ्यांना रात्रभर शंका आली नाही. ते बाहेर न आल्याने कर्मचाऱ्याने दार ढकलले आणि प्रकार उघड झाला.

Web Title : ओयो होटल में युवती की हत्या; प्रेमी पर पूर्व प्रयासों का संदेह।

Web Summary : नागपुर के पास ओयो होटल में रुचिरा भांगे की हत्या। उसके प्रेमी सौरभ जामगड़े पर शक है। उसने दो साल पहले भी उसे मारने की कोशिश की थी और हाल ही में उस पर हमला किया था। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Girl murdered in OYO hotel; boyfriend suspected due to past attempts.

Web Summary : Ruchita Bhange was murdered in an OYO hotel near Nagpur. Her boyfriend, Saurabh Jamgade, is suspected. He had previously attempted to kill her two years ago and recently assaulted her. Police are investigating.