घराचा दरवाजा बंद न करताच झोपी गेला, ४.८२ लाखांचा मुद्देमाल लंपास

By योगेश पांडे | Updated: July 7, 2023 12:19 IST2023-07-07T12:19:09+5:302023-07-07T12:19:36+5:30

जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

He fell asleep without closing the door of the house, worth 4.82 lakhs theft | घराचा दरवाजा बंद न करताच झोपी गेला, ४.८२ लाखांचा मुद्देमाल लंपास

घराचा दरवाजा बंद न करताच झोपी गेला, ४.८२ लाखांचा मुद्देमाल लंपास

नागपूर : घराचा दरवाजा बंद न करता झोपल्याने एका विद्यार्थ्याला ४.८२ लाख गमवावे लागले. जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेला रेहान अहमद उर्फ रियाझ अहमद (१९, वारीसपुरा) हा मेयोत परिचारिका असलेल्या त्याच्या आई व मामांसोबत राहतो. ६ जून रोजी आपल्या घरी मध्यरात्री झोपला होता. झोपण्याअगोदर त्याने घराचा दरवाजा बंद केला नव्हता व तो तसाच तळमजल्यावरील बेडरूममध्ये निघून गेला. रात्रभरात अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटातील रोख दीड लाख रुपये व सोन्याचांदीचे दागिने असा ४.८२ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी रियाझला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल आहे.

Web Title: He fell asleep without closing the door of the house, worth 4.82 lakhs theft