घरी बोलावून करायचा अल्पवयीन मैत्रिणीवर अत्याचार; गर्भधारणा झाल्यावर उघडकीस आला होता प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:32 IST2025-11-15T14:30:54+5:302025-11-15T14:32:58+5:30
सत्र न्यायालय : कपिलनगर पोलिसांच्या क्षेत्रातील घटना

He called his minor friend home and raped her; The incident was revealed after she became pregnant.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारंवार घरी बोलावून अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला शुक्रवारी २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास, अशी कठोर शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. ए. शेख यांनी हा निर्णय दिला. ही घटना कपिलनगर पोलिसांच्या क्षेत्रातील आहे.
राहुल चंदू आहुजा (३४) असे आरोपीचे नाव असून तो कळमना येथील रहिवासी आहे. समतानगर येथील दुसरा आरोपी अमोल महादेव गोंडाणे (२८) याला सबळ पुराव्यांअभावी करण्यात आले. निर्दोषमुक्त घटनेच्यावेळी पीडित मुलगी हीना (काल्पनिक नाव) १७ वर्षे वयाची होती. तिची शेंडेनगर येथील चर्चमध्ये राहुलसोबत ओळख झाली होती. नोव्हेंबर-२०२० मध्ये हीना मावशीच्या घरी जात असताना रस्त्यात राहुलचे घर पडले. त्यामुळे राहुलने तिला घरी बोलावले व घरी कोणीच नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला.
आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी
तसेच, यासंदर्भात कोणाला माहिती दिल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर राहुलने जानेवारी-२०२१ पर्यंत तिला वारंवार घरी बोलावून बलात्कार केला. परिणामी, तिला गर्भधारणा झाली. दरम्यान, तिची तब्येत खराब झाल्यामुळे पालकांना याविषयी कळले. न्यायालयात सरकारच्यावतीने अॅड. प्रशांत साखरे यांनी कामकाज पाहिले.
असा होता अमोलवरील आरोप
एप्रिल-२०२१ मध्ये हीनाने पहिल्यांदा जुना मित्र अमोलला तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली होती. अमोलने त्याचा फायदा घेतला. तिला चर्चा करण्यासाठी घरी बोलावले व चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. त्यानंतरही दोन-तीनदा या कुकृत्याची पुनरावृत्ती केली, असा आरोप होता. परंतु, अमोलविरुद्धचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही.